पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काश्मीरबद्दल (Kashmir) दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भारतीय फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने संतप्त व्यक्त केला आहेत. धवनने आफ्रिदीवर टीका करताना काश्मीर हा भारताचा एक भाग होता आणि तो नेहमीच राहील असे स्पष्ट केले. आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबद्दल वादग्रस्त भाष्य करताना दिसत आहेत. यापूर्वी युवराज सिंह, हरभजन सिंह आणि गौतम गंभीर यांनी आफ्रिदीची वादग्रस्त वक्तव्याबद्दल खरडपट्टी काढली होती. धवनने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, “जेव्हा संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध लढत आहे, तेव्हा आपल्याला अजूनही काश्मीरबद्दल पडले आहे. काश्मीर आमचा होता, आमचा आहे आणि आमचाच राहणार. तू 22 कोटी लोक जरी आणले ना तरी आमचा एक व्यक्ती सव्वा लाखांबरोबर आहे. बाकीची संख्या तुझी तुच मोज.” तत्पूर्वी आफ्रिदी म्हणाले होते की काश्मीरमधील जनतेचे दु:ख समजून घेण्यासाठी तुम्हाला धार्मिक श्रद्धेची गरज नाही, परंतु तुम्हाला योग्य ठिकाणी अंतःकरणाची गरज आहे. (शाहिद आफ्रिदीच्या काश्मीर, पंतप्रधान मोदींवरील विवादित टिप्पणीवर गौतम गंभीर ने सुनावलं; युवराज, हरभजन सिंह यांना झाला पश्चात्ताप)
Is waqt jab saari duniya corona se lad rahi hai us waqt bhi tumko kashmir ki padi hai.
Kashmir humara tha humare hai aur humara hi rahega. Chaiyeh 22 crore le ao, humara ek, sava lakh ke barabar hai . Baaki ginti apne aap kar lena @SAfridiOfficial
— Shikhar Dhawan (@SDhawan25) May 17, 2020
आफ्रिदीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबद्दलचे विधान चांगलंच महागात पडलं आहे. त्याच्या वक्तव्यामुळे आफ्रिदीवर भारतीय क्रिकेटरर्सनी सोशल मीडियाद्वारे निशाणा साधला आहे. आफ्रिदीविषयी टीकेचा दौरा सुरू झाला. हरभजन आणि युवराजनी आफ्रिदीबरोबरचे सर्व संबंध तोडले. हरभजन आणि युवराज यांनी कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत आफ्रिदी फाउंडेशनला दान देण्याचे आवाहन केले होते. पाहा धवनचे ट्विट:
युवराजने ट्वीट केले की, "आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध आफ्रिदीच्या विधानामुळे निराश झालो आहे. भारतासाठी खेळलेला एक जबाबदार नागरिक असल्याने मी असे शब्द स्वीकारू शकत नाही. मी तुमच्या सांगण्यावरून माणूस म्हणून हे आवाहन केले, पण आता पुन्हा नाही." आफ्रिदीच्या वक्तव्यावर हरभजननेही संताप व्यक्त केला आणि म्हणाला की यापुढे पाकिस्तानच्या खेळाडूशी त्याचा काही संबंध राहणार नाही. स्टार ऑफ स्पिनर म्हणाला, "खरे सांगायचे तर त्याने आम्हाला त्याच्या फाउंडेशनला मदत करण्यास सांगितले. अशा प्रकारे, आम्ही मानवतेसाठी आणि कोरोनाव्हायरस ग्रस्त लोकांसाठी यासाठी मदत केली."