नऊ डावात अपयशी ठरलेल्या Risabh Pant ला Shikhar Dhawan ने म्हटले 'मॅच विनर', Sanju Samson ला वाट पाहावी लागणार
Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

IND vs NZ: भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतसाठी (Risabh Pant) एकदिवसीय आणि टी-20 चे शेवटचे काही सामने चांगले राहिले नाहीत. दोन्ही फॉरमॅटमध्ये गेल्या नऊ डावांत त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. पंतने 10, 15, 11, 6, 6, 3, 9, 9 आणि 27 धावा खेळल्या आहेत. असे असतानाही त्याला सातत्याने संधी दिली जात आहे. पंतमुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) प्लेइंग-11 मध्ये ठेवले जात नाही. खराब फॉर्म असूनही त्याला शिखर धवनचा (Shikhar Dhawan) पाठिंबा मिळाला आहे, ज्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याचे नेतृत्व केले होते. शिखर धवनने पंतला मॅच विनर म्हटले आहे. कठीण काळात पंतला पूर्ण साथ मिळायला हवी, असे तो म्हणाला. पंतने अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये अनेक चमकदार खेळी खेळल्या आहेत, परंतु मर्यादित षटकांमध्ये तो खराब फॉर्मचा सामना करत आहे.

ऋषभ पंतला पुर्ण पांठिबा

धवन म्हणाला, “कर्णधार म्हणून माझ्यासाठी काहीही अवघड नाही. संजू सॅमसनला ज्या काही संधी मिळाल्या त्यामध्ये निःसंशयपणे चांगली कामगिरी केली आहे. परंतु काहीवेळा तुम्हाला तुमच्या संधीची वाट पहावी लागते कारण इतर खेळाडू चांगला खेळला आहे. पंतची क्षमता आम्हाला माहीत आहे. तो सामना जिंकणारा खेळाडू आहे. जर तो चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला पाठिंबा द्यायला हवा. (हे देखील वाचा: IND vs NZ 3rd ODI 2022: तिसरी वनडे पावसामुळे रद्द, न्यूझीलंडने मालिका 1-0 ने जिंकली)

सॅमसनला अजुन वाट पहावी लागणार

सॅमसनबद्दल बोलायचे झाले तर त्याला खूप कमी संधी मिळाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सॅमसनला ऑकलंडमध्ये पहिला वनडे खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने 36 धावा केल्या. त्यानंतर त्याला सलग दोन एकदिवसीय सामन्यांसाठी वगळण्यात आले. धवनला त्याच्याबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की सॅमसनला अजुन वाट पहावी लागेल.