रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानला संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर सुनील गावस्कर, वसीम जाफर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय सरफराज खानला या भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते, असे सोशल मीडियावरील चाहत्यांचे मत आहे. मात्र, कसोटी सामन्यांव्यतिरिक्त भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. (हेही वाचा - IND vs WI Test Series 2023: चेतेश्वर पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी? 'हे' खेळाडू शर्यतीत आघाडीवर)
आता सरफराज खाननेच बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सरफराज खानने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त करताना बीसीसीआयला प्रत्युत्तर दिले आहे. सरफराज खानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सरफराज खानच्या रणजी ट्रॉफी हंगामातील हायलाइट्स आहेत.
पाहा व्हिडिओ -
Justice for Sarfaraz Khan..
Selection = "Bik Gaya"
India team = Money >>> 🏆 with Good Players
Reason ICT not winning after 2013. POLITICS OVER CRICKET. They should set a bar for every individual and in that case Chamiya Chokli also not deserve a place.#SarfarazKhan #Kohli 🤡 pic.twitter.com/E2uq28Pdgc
— DJOKER (@Aniket_097) June 24, 2023
सरफराज खानने रणजी ट्रॉफी 2023 हंगामातील 9 डावात 556 धावा केल्या. सरफराज खानची या मोसमात सरासरी 92.66 होती. तर या युवा फलंदाजाने 72.49 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. याशिवाय सरफराज खानने तीनवेळा शतकाचा टप्पा ओलांडला, असे असतानाही बीसीसीआयच्या निवड समितीकडून सातत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.