राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Photo Credit: File Image)

राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) यांच्यात आज आयपीएलचा (IPL) 9वा सामना खेळला जाईल. आजच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजचा हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. दोन्ही टीमने यापूर्वीच्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे, आता दोन्ही टीमचे लक्ष आपला विजयी रथ सुरु ठेवण्यावर असेल. आजच्या सामन्यासाठी एकीकडे पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही, तर राजस्थानने जोस बटलर (Jos Buttler) आणि अंकित राजपूतला (Ankit Rajpoot) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे. बटलरचा यंदाच्या मोसमातील हा पहिला सामना असेल. (IPL 2020 Top-Scores So Far: KXIP कर्णधार केएल राहुल, MIचा रोहित शर्मा ते संजू सॅमसन; UAEमध्ये आजवर भारतीय फलंदाजांचे वर्चस्व, पाहा आकडेवारी)

दरम्यान, पंजाबने यंदा देखील 'युनिव्हर्स बॉस' क्रिस गेलचा अंतिम-11 मध्ये समावेश केला नाही. पंजाब तिसऱ्यांदा गेलऐवजी मैदानावर उत्तरेल. अशा स्थितीत मयंक अग्रवाल आणि कर्णधार केएल राहुल पंजाबकडून डावाची सुरुवात करतील. पंजाबचे गोलंदाजही चांगली कामगिरी बजावत आहेत. पण दोन्ही टीमसाठी काळजीचे मुख्य कारण त्यांची मधलीफाळी आहे. दोन्ही टीमची मधलीफाळी कमजोर आहे. दुसरीकडे, राजस्थानने बटलरचा समावेश केला आहे. राजस्थानने यशस्वी जयस्वालला बाहेर करून अंकित राजपूतला आणि डेविड मिलरच्या जागी बटलरची निवड केली.  बटलरने आजवर आयपीएलमध्ये राजस्थानसाठी मोठे डाव खेळले आहे आणि आयपीएलमधील विजयी घुडदौड कायम ठेवण्यासाठी टीमला बटलरकडून महत्वाचे डाव खेळण्याची अपेक्षा असेल. दरम्यान, जोफ्रा आर्चर राजस्थानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल.

पाहा राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबचा प्लेइंग इलेव्हन:

राजस्थान रॉयल्स: स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, रियान पराग, टॉम कुरन, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, अंकित राजपूत आणि जयदेव उनादकट.

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन/विकेटकीपर), मयंक अग्रवाल, करुण नायर, निकोलस पूरन, सरफराज खान, ग्लेन मॅक्सवेल, जिमी नीशम, मोहम्मद शमी, शेल्टन कॉटरेल, मुरुगन अश्विन आणि रवि बिश्नोई.