RR vs DC, IPL 2020: राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस, पहिले गोलंदाजीचा निर्णय; RR प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले दोन बदल

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज इंडियन प्रीमिअर लीगच्या 23व्या सामन्यात आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यासाठी रॉयल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केला असून अँड्र्यू टायला टॉम कुरनच्या जागी आणि अंकित राजपूतच्या जागी वरुण आरोनला संधी दिली आहे.

क्रिकेट Priyanka Vartak|
RR vs DC, IPL 2020: राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस, पहिले गोलंदाजीचा निर्णय; RR प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले दोन बदल
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)
रुण आरोनला संधी दिली आहे.
क्रिकेट Priyanka Vartak|
RR vs DC, IPL 2020: राजस्थान रॉयल्सने जिंकला टॉस, पहिले गोलंदाजीचा निर्णय; RR प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले दोन बदल
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

RR vs DC, IPL 2020: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आज इंडियन प्रीमिअर लीगच्या 23व्या सामन्यात आमने-सामने येतील. आजच्या सामन्यात रॉयल्सचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल्स आणि कॅपिटल्स यांच्यातील आजचा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. शारजाह स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या मागील अनेक सामन्यात संघांनी मोठी धावसंख्या उभारली आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात देखील असेच चित्र पाहायला मिळू शकते. दरम्यान, आजच्या सामन्यासाठी रॉयल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केला असून अँड्र्यू टायला टॉम कुरनच्या जागी आणि अंकित राजपूतच्या जागी वरुण आरोनला संधी दिली आहे. कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केलेला नाही. मागील तीन सामन्यात रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, त्यामुळे आजच्या सामन्यातून ते पुन्हा विजयपथावर परतण्याचा प्रयत्न करतील, तर कॅपिटल्स आपली विजयी घुडदौड कायम ठेवू पाहत असतील. (RR vs DC, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने तिन्ही विभागांत चांगली कामगिरी केली असून पाचपैकी चार सामने जिंकले. दिल्ली यंदा स्पर्धेतील एक बलाढ्य संघांपैकी एक आहे. कर्णधार अय्यर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत तर सलामीवीर पृथ्वी आणि मधल्या फळीत पंतनेही चांगली कामगिरी केली आहे. मार्कस स्टोइनिसने आजवर दोन अर्धशतकं केली आहेत. गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडाने आतापर्यंत 12 विकेट घेतल्या असून पर्पल कॅप काबीज केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्ट्जेनेही आवश्यकतेनुसार चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, राजस्थानची फलंदाजी कर्णधार स्मिथ, सॅमसन आणि जोस बटलरवर अवलंबून आहे. मधल्या फळीत महिपाल लोमरोर आणि राहुल तेवतिया यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. रॉयल्सकडून अँड्र्यू टायने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

पाहा राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर ((कॅप्टन), रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, इनरिच नॉर्टजे, हर्षल पटेल आणि कगिसो रबाडा.

दिल्ली कॅपिटल्स: जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, स्टिव्ह स्मिथ (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, राहुल तेवतिया, अँड्र्यू टाय, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, वरुण आरोन आणि अंकित त्यागी.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change