RCB vs KKR, IPL 2020: कोलकाता नाईट राईडर्सविरुद्ध सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा एकहाती विजय
विराट कोहली (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सामन्यात नाणे फेक जिंकत कोलकाता नाईट राईडर्सच्या संघाने (Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Bangalore) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, मोहम्मद सिराज, क्रिस मॉरिस, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या भेदक गोलंदाजीसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचे पहायला मिळाले. कोलकाताचा कर्णधार इयॉन मोर्गन याने सर्वाधिक 30 धावा केल्या आहेत. ज्यामुळे कोलकाच्या संघाला केवळ 84 धावापर्यंत मजल मारता आली आहे.  बेंगलोरच्या संघाने विजायासाठीचे आव्हान 14. 2 षटकामध्ये पूर्ण केले आहे.

कोलकाता संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे फसला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेला कोलकाताचा संघ 84 धावा करू शकला. कोलकाताने विजयासाठी दिलेले 85 धावांचे आव्हान बंगळरूने सहज पूर्ण केले. बेंगलोरकडून फिंच आणि पडीकल यांनी आश्वासक सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी केली. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात बेंगलोरच्या संघाने कोलकाताच्या संघावर 8 गडी राखून विजय मिळवला आहे. KKR Vs RCB, IPL 2020: मोहम्मद सिराज याची ऐतिहासिक कामगिरी; आयपीएलच्या एकाच सामन्यात 2 मेडन ओव्हर टाकणारा ठरला पहिला खेळाडू

आयपीएलचे ट्वीट-

आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत. तर 14 गुणांसह रॉयल चॅलेंजर्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा संघ असून त्यांची सरासरी +1.201 इतकी आहे. यामुळे यंदाचा आयपीएलमध्ये मुंबई आणि दिल्ली यांनी प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केली आहे. सध्या कोलकाता नाईट राईडर्स 10 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयलचा संघ 8 गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे. पंजाबच्या तुलनेत सरासरी रेट कमी असल्यामुळे राजस्थानचा संघ सहाव्या स्थानी आहे. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ सातव्या तर, चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे.