Rishabh Pant Injury Update: रिषभ पंतच्या दुखापतीवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिली महत्त्वपूर्ण माहिती, जाणून घ्या
आणि आता त्याला आगामी काही सामान्यांनाही मुकावे लागणार आहे. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात खेळत असताना पंतला दुखापत झाली होती. पंतला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असून तो किमान एक आठवडाभर स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितलं.
Rishabh Pant Injury Update: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात रविवारी झालेल्या आयपीएल सामन्यात एमआयने कॅपिटल्सविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आणि त्यांचा विजयीरथ रोखला. दोन्ही संघात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविण्यासाठी लढाईत सुरु होती ज्यात गेतजेत्या मुंबईने बाजी मारली. शिखर धवनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर डीसीने एकूण 162/4 धावसंख्या उभारली आणि शेवटच्या षटकात एमआयने सामना जिंकला. मुंबईसाठी क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनीही अर्धशतक ठोकले. दिल्ली फ्रँचायझीसाठी फक्त सामनाच नाही तर त्यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी समोर अली. दुखापतीमुळे रिषभ पंतला (Rishabh Pant) एमआयविरुद्ध सामन्याला मुकावे लागले आणि त्याच्या जागी अॅलेक्स कॅरीने (Alex Carey) घेतली. आणि आता त्याला आगामी काही सामान्यांनाही मुकावे लागणार आहे. (SRH vs RR, IPL 2020: राजस्थान रॉयल्सच्या मदतीला धावून आले राहुल तेवतिया-रियान पराग; SRHवर 5 विकेटने मात करत मोडली पराभवाची मालिका)
शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात खेळत असताना पंतला दुखापत झाली होती. पंतला झालेली दुखापत गंभीर स्वरुपाची असून तो किमान एक आठवडाभर स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचं दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितलं. “आम्हाला काहीच माहिती नाही (पंतच्या उपलब्धतेबाबत), डॉक्टर म्हणाले की त्याला आठवडाभर विश्रांती घ्यावी लागेल आणि आशा आहे की तो खरोखर मजबूत होऊन परत येईल,” श्रेयस अय्यरने यजमान ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सला सांगितले. दरम्यान, कॅपिटलविरुद्ध विजयासह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान परत मिळवले.
दिल्लीचा पुढील सामना 14 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सशी होईल ज्यांनी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. हैदराबादविरुद्ध राहुल तेवतिया आणि रियान पराग यांनी राजस्थानसाठी पराभवाच्या तोडून विजय खेचुन आणला. राजस्थानचा पराभव निश्चित दिसत असताना तेवतिया आणि रियानच्या जोडीने नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाला विजयीरेषा ओलांडून दिली. तेवतिया 45 आणि रियान 42 धावा करून नाबाद परतले. सनरायजर्सने 4 विकेट गमावून रॉयल्ससमोर विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य दिले होते. राजस्थान रॉयल्सचा आयपीएलमधील हा तिसरा विजय ठरला.