RCB Women Retained Players List WPL 2025: चॅम्पियन RCB ची रिटेंशन यादी जाहीर, स्मृती मानधनासह 14 खेळाडू कायम

डॅनी व्याट हॉजच्या ट्रेडनंतर, RCB मधील परदेशी खेळाडूंची संख्या 8 वर पोहोचली होती

RCB Women Retained Players List WPL 2025:  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB Women) ने वुमन्स प्रीमियर लीग 2025 (WPL) साठी त्यांची रिटेंशन यादी प्रसिद्ध केली आहे. आरसीबीने स्मृती मानधना, एलिस पेरी आणि रिचा घोष यांच्यासह एकूण 14 खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि एकूण सात खेळाडूंना सोडले आहे. बीसीसीआय महिला प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी मिनी लिलाव करणार आहे, ज्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

प्रत्येक संघाला 18 खेळाडूंचा संघ कायम ठेवण्याची परवानगी होती, त्यापैकी 6 परदेशी खेळाडू असणे बंधनकारक होते. डॅनी व्याट हॉजच्या ट्रेडनंतर, RCB मधील परदेशी खेळाडूंची संख्या 8 वर पोहोचली होती, त्यामुळे 6 परदेशी खेळाडूंच्या मर्यादेमुळे RCB ने इंग्लंडची कर्णधार हीथर नाइट आणि दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू नदिन डी क्लर्क यांना सोडले आहे.  (हेही वाचा  -  IND vs SA 1st T20: अक्षरचा कमबॅक तर KKR चा स्टार खेळाडू करू शकतो पदार्पण; अशी असू शकते पहिल्या T20 सामन्यात भारताची प्लेइंग इलेव्हन )

पाहा पोस्ट -

RCB ची रिटेंशन यादी: स्मृती मानधना, ऋचा घोष, एलिस पेरी, सबिनेनी मेघना, जॉर्जिया वारहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग ठाकूर, सोफी मोलिनौ, एकता बिश्त, केट क्रॉस, कनिका आहुजा (डब्ल्यु)

आरसीबीने या खेळाडूंना सोडले: सिमरन बहादूर, शुभा सतीश, इंद्राणी रॉय, दिशा कासट, श्रद्धा पोखरकर, हीदर नाइट आणि नदिन डी क्लर्क.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif