ICC च्या प्रश्नावर रविचंद्रन अश्विनने लहान असताना क्रिकेट विषयीच्या गैरसमजाचा केला खुलासा, पाहा Tweet
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्व जगभरातील सर्व खेळ रद्द केले गेले आहेत. संपूर्ण जग घरी बसून सोशल डिस्टंसिगच पालन करत असल्याने ट्विटरवर व्यस्तता बरीच वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक क्रिकेटपटू ट्विटरवर त्यांच्या चाहत्यांसमवेत प्रश्न-उत्तर सत्रांचे आयोजन करत आहेत. तथापि, त्यातील बहुतेक लोक आपल्या कुटुंबियांसमवेत घरी वेळ घालवत आहेत. क्रिकेटशी संबंधित अनेक प्रसिद्ध सोशल मीडिया हँडल त्यांच्या चाहत्यांना गुंतवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने त्यांच्या चाहत्यांसाठी एक प्रश्न पोस्ट केला. या प्रश्नामध्ये "लहानपणी तुम्हाला किती क्रिकेटचा गैरसमज होता?" असं विचारण्यात आले होते. बर्‍याच चाहत्यांनी आयसीसीच्या प्रश्नावर प्रतिसाद दिला. त्यापैकी काहींनी खुलासा केला की, रिकी पॉन्टिंगला त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याची धारणा असल्याचे म्हटले, तर काहींनी सनथ जयसूर्याबद्दलही असाच विचार असल्याचे उघड झाले. (ICC ने शेअर केलेल्या आकडेवारीत विराट कोहलीने पटकावले अव्वल स्थान, रोहित शर्माचा 'या' लिस्टमध्ये समावेश, पाहा)

या प्रश्नाला भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी सोशल मीडियावर टिपण्णी केली. तो म्हणाला की, लहानपणी कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे क्रिकेटर्सना त्यांची हरवलेली ऊर्जा परत मिळण्यास मदत होते आणि यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते अशी त्याची धारणा होती. पाहा ट्विट:

दरम्यान, अश्विन टीम इंडियाकडून यंदा फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर टेस्ट मालिकेत अखेर झळकला होता. त्या मालिकेत भारताला 2-0 ने क्लीन स्वीपला सामोरे जावे लागले होते. त्याने मालिकेतील एकच सामना खेळला आणि 3 विकेट्स घेतल्या.  अश्विन आपल्या चाहत्यांना या परिस्थितीतून घराबाहेर पडण्याचे परिणाम काय आहे याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. अश्विनने सोशल मीडियावर अनेक ट्विट केले असून त्यात कोविड-19 ची स्थिती सांगितली. कोविड-19 च्या जनजागृतीच्या प्रयत्नात त्याने रविचंद्रन अश्विनवरून सोशल मीडियावरील आपले यूजर नाव बदलून ‘लेट्स स्टे इंडोर इंडिया’ ठेवले. कोरोना व्हायरसचा धोका जगभर जंगलातील अग्निसारखा पसरत आहे. भारतात यापूर्वीच 10,000 हून अधिक लोक या आजाराने बाधित झाले आहेत.