बिर्याणीवरून बोलल्याचा राग Mohmme Shami ने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर काढला; Ravi Shastri यांनी जोहान्सबर्ग येथील तो प्रसंग केला उघड

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोहम्मद शमीशी संबंधित एक मजेदार गोष्ट जाहीर केली आहे. किस्सा 2018 मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्याचा आहे.

बिर्याणीवरून बोलल्याचा राग Mohmme Shami ने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर काढला; Ravi Shastri यांनी जोहान्सबर्ग येथील तो प्रसंग केला उघड
Ravi Shastri (Photo Credit - Twitter)

Ravi Shastri on Mohammed Shami: भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोहम्मद शमीशी (Mohammed Shami) संबंधित एक मनोरंजक गोष्ट सांगितली आहे. किस्सा 2018 मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी (south Africa Johannesburg Test 2018) सामन्याचा आहे. जेव्हा लंच ब्रेक वेळी बिर्याणी खायला अडवण्यात आल्यावर शमी रागावला होता. त्यानंर रागाच्या भरात त्याने गोलंदाजी करत 5 विकेट्स घेऊन, त्याने परदेशी भूमीवर भारताला विजय मिळवून दिला होता. जिथे भारताला सहसा दौऱ्यांदरम्यान एकाच विजयाची आस धरतो.

रवी शास्त्री आणि अरुण यांनी सोनी स्पोर्ट्सवर ही मनोरंजक गोष्ट सांगितली आहे. ही घटना 2018 मधील आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे झालेल्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी, पाचवा दिवस आणि जेवणाची वेळ होती. दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी अजून 223 धावा हव्या होत्या. 8 विकेट्स हातात होत्या. आफ्रिकन संघाने पहिले दोन कसोटी सामने जिंकून मालिका आधीच जिंकली होती आणि व्हाईटवॉशवर लक्ष केंद्रित केले होते.

जेवणाच्या वेळी, मोहम्मद शमी बिर्याणी खात होता. तेथून जाणाऱ्या प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शमीची प्लेट पाहिली आणि त्याला त्यावरून बोलले. शास्त्री सोनी स्पोर्ट्सला म्हणाले, 'आम्ही जोहान्सबर्गमध्ये होतो. तो शेवटचा दिवस होता. खेळ खूप तणावाचा होता. जेवणाची वेळ होती आणि मी जात असताना शमीची प्लेट पाहिली. ती बिर्याणीने भरलेली होती.'

भरत अरुण यांनी पुढील गोष्ट सांगितली की शास्त्री शमीकडे पोहोचले आणि बिर्याणी पाहिल्यानंतर त्याच्या भूकेबद्दल विचारले. 'रवी त्याच्या जवळ गेला आणि त्याला विचारले - तुझी भूक इथे संपली का?' शास्त्री फक्त एवढेच बोलले होते आणि शमी रागावला आणि मला बिर्याणी नको असं म्हणत तेथून गेला. यानंतर शास्त्रींनी गोलंदाजी प्रशिक्षक अरुण यांना शमीला एकटे सोडण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, 'रवी माझ्याकडे आला आणि म्हणाला- तो (शमी) रागावला आहे, त्याला असेच सोडून द्या. जर त्याला काही बोलायचे असेल तर काही विकेट्स घेतल्यानंतर मला सांगा.'

शमीने रागाच्या भरात बिर्याणीची प्लेट सोडली पण त्याने मैदानावर विरोधी संघात घबराट निर्माण केली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना पाणी पाजले. दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे 7 विकेट्स फक्त 22 धावांच्या अंतराने पडले. शमीने डावात 5 विकेट्स घेतल्या आणि भारताने तो सामना 63 धावांनी जिंकला. वँडरर्स स्टेडियमवरील हा भारताचा दुसरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकूण तिसरा विजय होता. सामना जिंकल्यानंतर भरत अरुणने तीच प्लेट शमीला दिली आणि म्हणाले, 'आता तुला पाहिजे तितकी बिर्याणी खा.' विजयाच्या आनंदाने वातावरण हलके झाले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2025 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).