मुंबई इंडियन्सच्या रसिख सलाम वर चुकीच जन्म प्रमाणपत्र दाखल केल्याबद्दल दोन वर्षाची बंदी
(Image Credit: Twitter)

यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळल्या काश्मिरी (Kashmiri) रसिख सलाम (Rasikh Salma) वर बीसीसीआय (BCCI) ने 2 वर्षांची बंदी घातली आहे. रसिख याने चुकीचा जन्माचा दाखला दिल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय यंदाच्या भारताच्या U-19 संघातून ही त्याचे नाव काढण्यात आले आहे. रसिकऐवजी संघात प्रभात मौर्या (Prabhat Maurya) याची निवड करण्यात आली आहे. भारताच्या U-19 टीमच्या ट्राय सीरिजला 21 जुलैपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे.

परवेझ रसूल (Parvez Rasool) नंतर आयपीएल (IPL) मध्ये झळकणार रसिख हा जम्मू-काश्मीरचा फक्त दुसरा खेळाडू आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये रसिख रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईकडून खेळाला. 17 व्या वर्षी आयपीएलमध्ये खेळणारा सगळ्यात लहान क्रिकेटपटू होण्याचं रेकॉर्डही त्याने केलं होतं. या मोसमात दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये रसिकने आयपीएल मध्ये पदार्पण केले होते.

डिसेंबर 2018 साली जम्मू-काश्मीरकडून खेळताना गुवाहाटी (Guwahati) विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. रसिखने 2 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 7 विकेट घेतल्या आणि 45 धावा केल्या.