बारामती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रंगणार रणजी सामना, पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड
Rohit Pawar and Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रणजी क्रिकेट करंडक सामना रंगणार आहे. हा सामना संपूर्ण बारामतीकरांसाठी पर्वणीच असणार आहे. BCCI चे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या हस्ते या सामन्याला प्रारंभ केला जाईल. 12 ते 15 फेब्रुवारी या दरम्यान होणा-या रणजी सामन्यातील पिहला सामना हा महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यात होणार आहे. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर रणजी सामने खेळण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने परवानगी दिली आहे.

बारामतीत रणजी सामान्यांचे आयोजन व्हावे या दृष्टीने शरद पवार यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर बीसीसीआयनेही रणजी सामने खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार या स्टेडियममधील पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड या संघात होत आहे. राजकीय मतभेद विसरून आमदार रोहित पवार यांनी केलं अमित ठाकरे यांचं मनसे नेतेपदाच्या जबाबदारीसाठी अभिनंदन; सोबत व्यक्त केला 'हा' आशावाद!

यातील महाराष्ट्र संघात ऋतुराज गायकवाड, अंकीत बावने, नौसाद शेख, राहुल त्रिपाठी यांसारखे दिग्गज खेळणार आहेत. बारामतीत होणारे हे सर्व सामने बारामतीकरांना विनामूल्य पाहण्यास खुले असतील, अशी माहिती धीरज जाधव यांनी दिली आहे.

ग्रामीण भागात प्रथमच रणजी सामना खेळविला जाणार असून या निमित्ताने बारामतीच्या क्रीडा विभागाला अधिक चालना मिळणार आहे. रणजी करंडकात 41 वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई संघाचा शुक्रवारी स्वप्नभंग झाला. सौराष्ट्र आणि मुंबई यांच्यात खेळलेला सामना चौथ्या आणि शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला, परंतु पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे सौराष्ट्रला तीन, तर मुंबईला एक गुण मिळाला. त्यामुळे मुंबई स्पर्धेतून बाहेर गेली आहे.