Rahul Tewatia चे खुल्लम खुल्ला प्रपोजल, सर्वांसमोर Kiss करून ‘तिला’ घातली लग्नाची मागणी; व्हायरल Video पाहून पोट धरून हसाल!
राहुल तेवतियाचे खुल्लम खुल्ला प्रपोजल (Photo Credit: Twitter/@rajasthanroyals)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 पुढे ढकलल्यानंतर राजस्थान रॉयल्सने  (Rajasthan Royals) एक आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या चाहत्यांना खूप पसंत पडत आहे. व्हिडिओमध्ये राजस्थानचा खेळाडू राहुल तेवतिया (Rahul Tewatia) हास्यास्पद अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. व्हिडिओ प्रत्यक्षात जोस बटलरची मुलगी जॉर्जियाच्या (Georgia) 20 एप्रिल रोजी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीचा आहे, ज्यामध्ये सर्व खेळाडू मैदानावरील ताण कमी करत खेळाचा आनंद घेताना दिसत आहेत. यंदाच्या आयपीएल (IPL) दरम्यान कोविड-19 च्या प्रोटोकॉल अंतर्गत प्रत्येक संघासाठी विशेष बायो-बबल तयार करण्यात आले होते. यामध्ये खेळाडूंवर अनेक प्रकारचे निर्बंध होते पण त्याचे काही फायदे देखील पाहायला मिळाले. (नया है वह! Riyan Parag-राहुल तेवतियाच्या विकेट सेलिब्रेशनने वेधले सर्वांचेच लक्ष, सामना सुरु असताना मैदानात घेतली सेल्फी, पहा मजेशीर Photo)

बटलरच्या मुलीच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रॉयल्सचे सर्व खेळाडू गाणं सुरु असताना उशी पास करण्याचा एक खेळ खेळत आहेत. गाणं थांबलं तेव्हा ही उशी राहुलजवळ आली तेव्हा तेवतियाला काय म्हणून पाण्याच्या बाटलीला प्रपोज करायला सांगितलं. राहुलने यादरम्यान बाटलीला आय लव्ह यू म्हटलं आणि किस करून खिलाडू वृत्तीने कार्य पूर्ण केलं. राहुलने पाण्याची बाटली हातात घेतली आणि म्हणाला, “तू खूप सुंदर आहेस. I Love You. माझ्याशी लग्न करशील का?” राहुलचा हा असा खुल्लम खुल्ला प्रपोजल ऐकून राजस्थानच्या खेळाडू देखील पोट धरून हसू लागतात.

दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या मोसमात झालेल्या 29 सामन्यात तेवतियाने 7 सामने खेळले आणि 86 धावा केल्या तसेच दोन विकेट्स घेतल्या. या हंगामात संजू सॅमसनने राजस्थानचा कर्णधारपद भूषवले आणि संघाला 7 सामन्यांपैकी 3 सामने जिंकण्यात यश आले. आयपीएल स्थगित झाला तेव्हा पॉईंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ पाचव्या क्रमांकावर होता. या हंगामात संजूने कर्णधार म्हणून पदार्पण करत शानदार शतकी खेळी करत या स्पर्धेची दमकेदार सुरूवात केली. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर काही खेळाडू आपल्या देशात परतले आहेत, तर काही खेळाडू अजूनही भारतात अडकले आहेत. यंदा आयपीएल स्थगित करण्यात आले असले तरी चाहते लवकरच आपल्या आवडत्या खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.