पाकिस्तान क्रिकेटपटू आणि मॅच फिक्सिंग यासंदर्भात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आल्या आहेत. पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमल (Umar Akmal) याला मोठा झटका लागला आहे. आज लाहोर येथील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Pakistan Cricket Board) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने भ्रष्टाचार प्रकरणी सुनावणी केली. या सुनावणीत अकमलवर 3 वर्षासाठी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून अडचणीत आलेला उमर अकमल याला पाकिस्तान बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू होण्याआधीच निलंबित केले होते. ही स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस आधी बोर्डाने ही कारवाई केले होती.

मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात पीसीबीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने अकमलला नोटीस पाठवली होती. अमर अकमलवर एका सट्टेबाजाला भेटने आणि मॅच फिक्स करण्यासंदर्बात चर्चा केल्याचा आरोप होता. याप्रकरणी चौकशी समितीने अमर अकमलचा मोबाईल देखील जप्त केला होता. यानंतर आज झालेल्या सुनावणीत अकमलवर 3 वर्षा सर्व प्रकारचे क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे. हे देखील वाचा- ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शेड्युलमध्ये करू शकते बदल, टीम इंडिया ठामपणे पहिल्या स्थानावर कायम

पीसीबीचे ट्वीट-

उमर अकमलने आपल्या कारकिर्दीत पाकिस्तानकडून 16 कसोटी आणि 121 एकदिवसीय सामने खेळला आहे. तसेच 84 टी-20 सामने खेळला आहे. 29 वर्षीय उमर अकमलने पाकिस्तान संघाकडून मार्च 2019 मध्ये अखेरचा सामना खेळला होता. मात्र गेल्या महिन्यांपासून अकमल नेहमीच आत- बाहेर राहिला आहे.