BCCI: इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावरून भारताला दोष देणाऱ्या पाकिस्तानला बीसीसीआयने सुनावले
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

न्यूझीलंड (New Zealand) संघाच्या पाठोपाठ इंग्लंडच्या (England) संघानेही पाकिस्तानच्या दौरा रद्द केला आहे. ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) मोठा फटका बसला आहे. दरम्यान, सुरक्षतेच्या कारणास्तव न्यूझीलंडने हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तर, इंग्लंडने त्यांच्या खेळाडूंची मानसिक आणि शाररिक स्थिरता राखण्यासाठी दौरा रद्द करण्याचे म्हटले आहे. या दोन्ही संघानी दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तान आर्थिक आणि नैतिकदृष्ट्या प्रभाावित झाला आहे. दरम्यान, पीसीबीचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी दोन्ही देशांवर टीका केली आहे. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तानचे काही मंत्री आणि माजी खेळाडूंनी दौरा रद्द करण्यामागे भारताचा हात असल्याचे म्हणत आहेत. तसेच बीसीसीआयलाही (BCCI) दोषी ठरवत आहेत.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितले की, भारताला मोठ्या किंवा छोट्या कोणत्याही समस्येत सामील करणे ही त्यांची जुनी सवय आहे, ती सुद्धा कोणत्याही पुराव्याशिवाय.आम्ही रमीज राजा, पाकिस्तानला त्यांच्या कार्यकाळात नवीन उंची गाठण्याची शुभेच्छा देतो. तसेच न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरा रद्द करण्यामागे बीसीसीआयचा हात नाही, हे स्पष्टपणे सांगतो. हे देखील वाचा- IPL 2021: महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जबाबत माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांचे धक्कादायक विधान

"आमच्याकडे या सर्व गोष्टींसाठी वेळ नाही. मला माहित नाही की पाकिस्तानचे काही माजी खेळाडू आयपीएलला दोष का देत आहेत? मी कुठेतरी वाचले की रमीजने असे म्हटले आहे की ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पैशांसाठी त्याचा डीएनए बदलला आहे. रमीजने ऑस्ट्रेलियनवर आरोप केले आहेत आयपीएलमुळे खेळाडूंनी आपली आक्रमक वृत्ती सोडून दिली आणि भारताविरुद्ध सामान्य पद्धतीने खेळले. मात्र, या सर्वांमध्ये आयपीएलचा काय संबंध, हा कोणत्या प्रकाराचा आरोप आहे. आम्हाला माहिती आहे की हे त्यांना आवडत नाही. परंतु, प्रत्येक मुद्द्यांमध्ये भारताला समील करणे योग्य नाही, असेही त्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.