दिग्गज खेळाडूंना घातक बॉलिंगने गुडघे टेकण्यास भाग पाडलेला पाकिस्तानी गोलंदाज रस्त्यावर विकतोय चणे, Video सोशल मीडियात व्हायरल

या व्हिडिओमध्ये वहाब रस्त्यावर “चणे” विकताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या या वरिष्ठ वेगवान गोलंदाजाने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानी गोलंदाजी विकतोय चणे (Photo Credit: Twitter)

Wahab Riaz Selling Chana: पाकिस्तानचा (Pakistan) स्टार वेगवान गोलंदाज वहाब रियाजने (Wahab Riaz) सोमवारी ट्विटरवर सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला जो की सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वहाब रस्त्यावर “चणे” विकताना दिसत आहे. गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या या वरिष्ठ वेगवान गोलंदाजाने शेअर केलेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रियाजने देखील विनोद म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. लक्षात घ्यायचे वहाब गेल्या काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. वहाब त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतो. तो वासिम अकरम, वकार युनूस आणि मिसबाह-उल-हक यांच्यासह आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 शो द पॅव्हेलियनमध्ये दिसला होता.

“तुमचा दिवसाचा “चानो वाला चा-चा”! तुमच्या ऑर्डर्स पाठवा ‘किया बनाओ और कितने का बना?’ P.S. या खास हातगाडीभोवती काही वेळ घालवताना मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण झाली,” वहाबने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले. दरम्यान, 36 वर्षीय वेगवान गोलंदाज पाकिस्तानचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज वहाब रियाजने 2023 मध्ये भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. रियाजने सांगितले की संघातील स्थान टिकवून ठेवताना खेळाडूची तंदुरुस्ती आणि कामगिरीला महत्त्व असते आणि त्याला त्याच्या संघावर ओझं बनायचे नाही. त्यामुळे, अनुभवी वेगवान गोलंदाज 2023 वनडे विश्वचषकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडेल. तथापि तो जगभरातील लीग खेळण्यासाठी उपल्बध असेल.

दरम्यान वहाब रियाजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर वहाब रियाजने 27 कसोटी, 91 वनडे आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 83, एकदिवसीय सामन्यात 120 आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 34 विकेट आहेत. इतकंच नाही तर त्‍याने बॅटने योगदान देत आतापर्यंत करिअरमध्‍ये 1000 पेक्षा अधिक धावाही केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीन अर्धशतके आहेत. मात्र, पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2020 मध्ये त्याने शेवटचा वनडे आणि टी-20 सामना खेळला. तर 2018 पासून तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif