Muneeba Ali Run Out Controversy: मुनीबा अलीच्या वादग्रस्त धावबादवर पाकिस्तानच्या गोलंदाजाचं मोठं विधान; 'जे काही झालं, ते...'
भारताच्या ८८ धावांनी झालेल्या दणदणीत विजयानंतर, पाकिस्तानची वेगवान गोलंदाज डायना बेग (Diana Baig) हिने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर डायना बेगने माध्यमांशी बोलताना सांगितले की...
IND W vs PAK W: कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान महिला संघात झालेल्या विश्वचषक सामन्यात मुनीबा अलीच्या (Muneeba Ali) वादग्रस्त धावबादमुळे निर्माण झालेला गोंधळ अखेर संपला आहे. भारताच्या ८८ धावांनी झालेल्या दणदणीत विजयानंतर, पाकिस्तानची वेगवान गोलंदाज डायना बेग (Diana Baig) हिने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर डायना बेगने माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मला वाटते की मुनीबा यांच्या धावबाद होण्याचा प्रश्न आधीच सुटला आहे. मी सध्या त्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही. मैदानात जे काही घडले आणि परिस्थिती कशीही असली तरी, मला वाटते की ते प्रकरण निकाली काढले गेले आहे." डायना बेगच्या या वक्तव्यामुळे, मैदानात पंचांच्या निर्णयावर झालेल्या गोंधळावर आता पडदा पडला आहे.
नेमकं काय होतं मुनीबा अलीच्या धावबादचे प्रकरण?
हा संपूर्ण प्रकार भारताच्या डावातील चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडला. गोलंदाज क्रांती गौर हिच्या चेंडूवर भारतीय संघाने मुनीबा अलीसाठी एलबीडब्ल्यूची (Leg Before Wicket) अपील केली. मैदानावरील पंचांनी हे नॉट आउट दिले.
चेंडू मुनीबाच्या पॅडला लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या दीप्ती शर्माकडे गेला. दीप्तीने त्वरित चेंडू स्टंपवर फेकला. त्याच क्षणी, मुनीबा अलीने तिची बॅट क्रीजमध्ये टेकीव न ठेवता क्षणार्धात हवेत उचलली होती.
भारतीय संघाने धावबादसाठी (Run Out) अपील केले. रीप्लेमध्ये स्पष्ट झाले की, चेंडू स्टंपला लागला तेव्हा मुनीबाची बॅट क्रीजच्या आत होती, परंतु ती हवेत होती.थर्ड अंपायरने सुरुवातीला आंशिक रीप्ले पाहून नॉट आउट दिले.
मात्र, नंतर पूर्ण रीप्ले पाहिल्यानंतर त्यांनी मुनीबाला बाद घोषित केले. यामुळे पाकिस्तानी संघात गोंधळ निर्माण झाला. मुनीबाने १२ चेंडूत केवळ २ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. कर्णधार फातिमा सना ही सुद्धा फोर्थ अंपायरशी वाद घालताना दिसली होती.
भारताचा पाकिस्तानवर मोठा विजय
मुनीबा अलीच्या या वादग्रस्त धावबादसह, भारताने संपूर्ण सामन्यात आपले वर्चस्व कायम राखले भारताने पाकिस्तानविरुद्धच्या या दुसऱ्या विश्वचषक सामन्यात ८८ धावांनी विजय मिळवला. भारताने ठेवलेल्या २४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ ४३ षटकांत फक्त १५९ धावांवर गारद झाला. भारतीय महिला संघाने पाकिस्तानविरुद्धची आपली विजयी परंपरा कायम राखत, विश्वचषकात सलग दुसरी महत्त्वपूर्ण जिंक नोंदवली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)