On This Day In 2011: आजच्या दिवशी टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध कायम ठेवला वर्ल्ड कपमधील अजिंक्य रेकॉर्ड, कट्टर प्रतिस्पर्धीला पराभूत करत गाठली अंतिम फेरी
भारत विरुद्ध पाकिस्तान 2011 वर्ल्ड कप सेमीफायनल (Photo Credit: Getty Images)

30 मार्च ... ही ती तारीख आहे जी भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) इतिहासामध्ये खूप महत्वाची आहे. आज, अगदी 9 वर्षांपूर्वी, 2011 मध्ये भारताने आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) फायनलमध्ये स्थान मिळवले आणि सेमीफायनलमध्ये त्यांचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (Pakistan) पराभूत केले होते. क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा सामना भारत-पाकिस्तानमध्ये असतो तेव्हा थरारला मर्यादा नसते. मोहाली (Mohali) येथे खेळलेला हा सामना अजूनही प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांना लक्षात राहील कारण टीम या सामन्यासाठी जो दबाव टीम इंडियावर होता तो त्याच्या खेळाडूंनी क्वचितच कधी जाणवला होता. एका आठवड्यापूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता आणि त्यानंतर मोहालीतील टायटन्स ऑफ मॅच सामना जिंकला होता. सामन्यासाठी उत्साह शिगेला होता. काहींनी तर या सामन्याला फायनलपूर्वीचं फायनल म्हण्टलं होतं. भारत घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक सेमीफायनल सामना खेळत होता.

पाकिस्तानविरुद्ध उपांत्य सामन्यात भारताने 29 धावांनी विजय मिळवला आणि सचिन तेंडुलकर विजयाचा नायक ठरला. भारताने पहिले फलंदाजी करत 260 धावा केल्या आणि नंतर पाकिस्तानला 231 धावांवर ऑलआऊट केले. सचिनने या सामन्यात 85 धावांचा डाव खेळला. पाकिस्तानची खराब फिल्डिंग त्यांना महागात पडली. त्यांनी सचिनला एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 4 जीवनदान दिले. मिस्बाह-उल-हक, युनिस खान, उमर गुल आणि कामरान अकमल अशा खेळाडूंकडून सचिनला जीवनदान मिळाले. सचिनला 100 वे आंतरराष्ट्रीय शतक नोंदविण्यासाठी एका शतकाची गरज होती आणि पाकिस्तानविरुद्ध तो जादुई क्षण पाहण्याची अपेक्षा चाहत्यांना होती, मात्र सचिनने त्यांना निराश केले. सचिन 85 धावांवर बाद झाला.

त्यानंतर भारताच्या सर्व गोलंदाजांनी झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत पाकिस्तानचा खेळ संपवला. यासह विश्वचषकात पाकिस्तानचा पुन्हा एकदा भारताला पराभूत करण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप सामन्यात भारताचा हा सलग पाचवा विजय होता आणि तेंडुलकर आणि गोलंदाजांच्या धमाकेदार खेळाशिवाय हे शक्य झाले नसते.