On This Day: 2016 टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर एमएस धोनी ने घेतली होती पत्रकारची क्लास, निवृत्तीच्या प्रश्नावर दिले असे मजेदार उत्तर
(Photo Credit: Twitter/@Offl_MSDian)

आजच्या दिवशी, 4 वर्षांपूर्वी वेस्ट इंडीज टीमविरुद्ध (West Indies) 2016 टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनल (World Cup Semi-Final) सामन्यात भारताला (India) 7 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वातील टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत 193 धावांचे लक्ष्य ठेवले प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 7 विकेट आणि 2 चेंडू राखून लक्ष्य गाठले. या वर्ल्ड कपचे आयोजन भारतात करण्यात आले होते. सेमीफायनलमधील यजमान टीमच्या पराभवानंतर धोनीने पत्रकारांशी बोलताना आपल्या निवृत्ती संबंधित प्रश्नाचे उत्तर अतिशय अनोख्या पद्धतीने दिले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर धोनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होता. दरम्यान, ऑस्ट्रेलियन पत्रकार सॅम फेरीसने (Sam Ferris) धोनीला विचारले की वेस्ट इंडीजकडून या पराभवानंतरही आपण खेळत राहणार का? यानंतर धोनीने अतिशय मजेदार पत्रकाराला स्टेजवर बोलावले आणि त्याच्या शेजारी बसवले. यानंतर धोनीने त्याला प्रश्न विचारले की आपणास वाटते की मी निवृत्त होऊ? किंवा त्याचा खेळ किंवा फिटनेस त्यांना आवडत नाही? त्याला उत्तर देताना पत्रकार म्हणाला की त्याची शैली त्यांना आवडते. मैदानात धावताना आपण स्लो असल्याचे दिसते का, असा सवालही त्याने केला. (On This Day In 2001: आजच्या दिवशी सचिन तेंडुलकर ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला करिष्मा, वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा बनला पहिला फलंदाज)

क्वार्टरफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर भारताचा मनोबल वाढला होता. मुंबईमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने पहिले फलंदाजी केली. विराट कोहली सर्वाधिक 89 धावा करून नाबाद परतला. विराटने अवघ्या 47 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 89 धावा फटकावल्या. रोहित शर्माने 43 आणि अजिंक्य रहाणेने 40 धावांचे योगदान दिले. अखेरीस निर्धारित 20 ओव्हरमध्ये भारताने 2 विकेट्स गमावून 192 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. भारताने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लेंडल सिमन्स आणि जॉन्सन चार्ल्सच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर वेस्ट इंडीजने टीम इंडियाचा 7 गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. विंडीजकडून जॉन्सन चार्ल्स 52, सिमन्स नाबाद 82 आणि आंद्रे रसेलने नाबाद 43 धावा केल्या.

दुसरीकडे, 2019 च्या वर्ल्ड कपनंतर धोनीच्या निवृत्तीवर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या विश्वचषकमध्ये धोनीच्या संथ खेळीवर कसून टीका केली जाऊ लागली. धोनीने आता खेळातून निवृत्ती घ्यावी असे चाहते आणि विशेषज्ञाचें मत आहेत. मात्र, धोनी यावर कधीही उघडपणे बोलला नाही आणि निवृत्तीवर सस्पेन्स कायम ठेवला.