On This Day, March 14, 2001! आजच्या दिवशी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला केले होते निरुत्तर, रचला इतिहास
व्हीव्हीस लक्ष्मण आणि राहुल द्रविड (Photo Credit: Twitter/VVSLaxman281)

2001 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी ईडन गार्डन स्टेडियमवर (Eden Gardens) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या अनुक्रमे 180, 281 धावांचा डाव आज क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. जेव्हा पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासाबद्दल बोलले जाईल तेव्हा लक्ष्मण आणि द्रविडचं नाव पूर्ण सन्मानाने घेतले जाईल. त्यांनी 19 वर्षांपूर्वी, याच दिवशी (14 मार्च 2001) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात असा चमत्कार केला ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती. आजच्या दिवशी 'द वॉल' द्रविड आणि 'व्हेरी-व्हेरी-स्पेशल' लक्ष्मणने 19 वर्षांपूर्वी कोलकातामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये भागीदारीचा इतिहास रचला होता. लक्ष्मण आणि द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2001 वर्षी 376 धावांची भागीदारी केली होती, ज्याच्या सामोरे बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ देखील निरुत्तर होता. दोन्ही खेळाडूंच्या या खेळीला क्रिकेटच्या इतिहासात कधीच विसरता येणार नाही.

11 मार्च रोजी सुरू झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या ज्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 171 धावांवर ऑलआऊट झाला. त्यांना फॉलोऑन देण्यात आला आणि तिसर्‍या दिवशी पराभवाचे ढग भारतावर फिरत होते. तेव्हा सामन्याच्या चौथ्या दिवशी लक्ष्मण आणि द्रविड विकेटवर टिकून फलंदाजी करत होते आणि दिवसाखेर भारताने एकही विकेट न गमावता 589 धावा केल्या. लक्ष्मणने 281 आणि द्रविडने 180 धावा करत 376 धावांची भागीदारी केली. भारताने फॉलोऑन डाव 657/7 वर घोषित केला. लक्ष्मणने 631 चेंडूत 44 चौकार ठोकले तर द्रविडने 446 चेंडूत 20 चौकार ठोकले. लक्ष्मण आणि द्रविडच्या 'त्या' ऐतिहासिक डावाचा हा व्हिडिओ नक्की तुमच्या आठवणींना उजाळा देईल.

आजच्या खास दिवसाची आठवण म्हणून स्वतः लक्ष्मणनेही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. त्यानंतर ऑफस्पिनर हरभजन सिंहने 6 विकेट घेऊन आस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. भज्जी व्यतिरिक्त सचिन तेंडुलकरने 3 गडी बाद केले. ऑस्ट्रेलिययाचा दुसरा डाव 68.3 ओव्हरयामध्ये 212 धावांवर संपुष्टात आला आणि भारताने कसोटी सामना 171 धावांनी जिंकला. लक्ष्मण आणि द्रविडच्या भागीदारीने असा चमत्कार केला ज्याने भारतीय संघाबद्दल चाहत्यांचा दृष्टीकोन बदलला.