चांद्रयान-2 चे औचित्य साधत हरभजन सिंहने पाकिस्तान आणि अन्य देशांवर साधला निशाणा, Netizens ने ही सुनावले
हरभजन सिंह (Photo Credit: Twitter)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो (Indian Space Research Organisation) च्या बहुचर्चित चांद्रयान-2 (Chandrayaan 2) या भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाने काल, २२ जुलैला अवकाशात झेप घेतली. इस्रोच्या चांद्रयान-२ च्या यशस्वी झेपसाठी देशभरातून शुभेच्छाचा वर्षाव होतोय. यात काही राजकीय व्यक्ति आहे, तर काही अभिनेता. खेळपटू देखील मागे नाही आहे. वीरेंद्र सेहवाग पासून व्हीव्हीएस लक्षण पर्यंत सर्वांनी इस्रोला त्यांच्या या यशस्वी प्रक्षेपणासाठी अभिनंदन केले आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) देखील मागे राहिला नाही. आणि त्याने आपल्या खास अंदाजात ट्विट करत इस्रोला शुभेच्छा दिल्या. याच बरोबर भज्जीने पाकिस्तानवर ही निशाणा साधला. (Chandrayaan 2: ISRO च्या कामगिरीचा खेळाडूंनाही अभिमान, ट्विट करत केला अभिनंदनाचा वर्षाव)

ट्विटरवर पोस्ट शेअर करत भज्जी म्हणाला की, "काही देशांच्या ध्वजांवर चंद्र आहे, तर काही देशांचा चंद्रावर ध्वज आहेत." भज्जी यांनी त्यांनी ध्वजांवर चंद्र आहे या ट्विटसाठी पाकिस्तान, तुर्की, लिबिया, ट्युनिशिया, अझरबैजान, अल्जीरिया, मलेशिया, मालदीव आणि मॉरिटानिया यांचे ध्वज वापरले. तर चंद्र नसलेल्या ध्वजासाठी त्यांनी भारत, अमेरिका, चीन आणि रशिया यांचे ध्वज वापरले. भज्जीने असे ट्विट करताच काही नेटिझन्स भडकले आणि त्यांनी त्याला खडेबोल सुनावले.

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) च्या नियोजनानुसार चांद्रयान-2 यशस्वीपणे आकाशात झेपावले. GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून चांद्रयान-2 ने उड्डाण केलं. अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्रावर पोहोचेल. त्यानंतर ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेने त्याची वाटचाल होईल.