महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: नांदेड जिल्ह्यातील लोहा ते मुखेड मतदार संघाचे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतची अंतिम वेळ आली आहे. 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात 288 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 सदस्यांमध्ये भाजपचे 122, शिवसेनेचे 63, कॉंग्रेसचे 42 आणि राष्ट्रवादीचे 41 सदस्य आहेत. विद्यमान विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपेल. त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 24 ऑक्टोबर रोजी येतील.यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवणार आहे. नांदेडची निवडणूक महत्वाची ठरणार आहे. राज्यचे माजी उपमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पत्नी अमित यांना तिकीट मिळाले आहेत. नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा सीट आहेत.

लोहा विधानसभा मतदारसंघ

शिवसेना नेते प्रतापराव गोविंदराव चिखलीक हे 2014 मध्ये लोहा विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 मध्ये सेनेकडून प्रतापराव आणि भाजपकडून मुक्तेश्वर धोंडगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. लोह, हा नांदेड जिल्ह्यातील महत्वाचा मतदार संघ मानला जातो. स्वातंत्रानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळायची. एकेकाळी विधानसभा गाजवून सोडणारे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख होती.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

प्रतापराव गोविंदराव, शिवसेना- 92, 435

मुक्तेश्वर धोंडगे, भाजप- 46,949

शंकर अण्णा, राष्ट्रवादी - 29,294

रोहिदास चव्हाण, मनसे- 6,568

लोह विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

दिलीप धोंडगे, राष्ट्रवादी

मुकेश्वर धोंडगे, शिवसेना

हणमंत वडवाले, बीएसपी

रुक्मीनबाई शंकरराव गीते, जनता दल (सेक्युलर)

सुभाष बागवान कोल्हे, संभाजी ब्रिगेड पार्टी

नायगाव विधानसभा मतदारसंघ

2009 मध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध अपक्ष अशी लढत झाली होती. यात राष्ट्रवादीचे बापूराव गोरठेकर यांचा 11 हजार मतांनी पराभव झाला होता. आणि तितक्याच फरकाने 2014 मध्ये वसंतराव चव्हाण यांनी भाजप नेते राजेश पवार यांचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा विजयी झाले होते. आणि आता बापूराव गोरठेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता याचा फायदा आगामी निवडणुकीत भाजपला होऊ शकतो. आमदार म्हणून वसंतराव चव्हाण यांनी खूप काम केले आहेत.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

वसंतराव चव्हाण, काँग्रेस- 71, 020

राजेश संभाजी पवार, भाजप- 60, 595

श्रीनिवास देशमुख, राष्ट्रवादी- 57,247

सैयद इस्माइल, बसपा- 3,098

नायगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

वसंतराव चव्हाण, काँग्रेस

राजेश पवार, भाजप

अनिकेत शिंदे, संभाजी ब्रिगेड पार्टी

बाबाराव डोणगावकर, नॅशनल सोशलिस्ट पार्टी (युनायटेड)

अजज नाजिरसब सय्यद, एआयएमआयएम

देगलूर विधानसभा मतदारसंघ

देगलूर मतदारसंघ SC प्रवर्गासाठी आरक्षित जागा आहे. ही जागा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सिमारेषेजवळ आहे. या मतदारसंघातून 2014 मध्ये शिवसेनेचे सुभाष साबणे आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 साली काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साबणेविरुद्ध विजय मिळवला होता. कर्नाटकच्या सीमारेषे जवळील मतदारसंघ असल्यामुळे अपेक्षित असा विकास या मतदार संघात झाला नाही. मागील निवडणुकीत साबणे फक्त 8,648 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

सुभाष साबणे, शिवसेना- 66, 852

रावसाहेब जेवंत, काँग्रेस- 58,204

भीमराव क्षीरसागर, भाजप- 20,542

मशना वाडेकर, राष्ट्रवादी- 12,126

देगलूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहा

अंतापूरकर रावसाहेब जयवंता, काँग्रेस

सुभाष पिराजीराव सबणे, शिवसेना

सावित्रीबाई श्रीहरी कांबळे, बीएसपी

रामचंद्र भारंडे, अपक्ष

विमल वाघमारे, नॅशनल सोशलिस्ट पार्टी (युनायटेड)

मुखेड विधानसभा मतदारसंघ

या क्षेत्रातील जनतेला बराच काळ मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. याचा फटका काँग्रेस आणि त्यांच्या उमेदवाराला पडला. हा मतदारसंघ ओपन प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात एकही मोठा उद्योग नसल्याने येथील तरुणांना कामासाठी इत्रत जावे लागायचे. शेती येथील प्रमुख व्यवसाय आहे पण, अजूनही इथे सिंचनाची योग्य सुविधा नाही. महाराष्ट्रात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुखेड विधानसभा मतदार संघातून 1 लाख पेक्षा अधिक मतं मिळवत भाजपचे गोविंद मुकाजी विजयी घोषित झाले. या मतदारसंघात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये असणार आहे.

विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2014

गोविंद मुकाजी, भाजप- 1,18,781

बतमोगरेकर पाटिल, काँग्रेस- 45,490

लोबंदे वेंकट मंगाजी. शिवसेना, 3,930

बाळासाहेब देशमुख, बसपा- 2,466

विधानसभा मतदार संघातील उमेदवार नावे इथे पाहाजितेंद्र वाघमारे, बीएसपी

तुषार राठोड, भाजप

भाऊसाहेब पाटील, काँग्रेस

बालाजी जनार्दन आगलावे, संभाजी ब्रिगेड पार्टी

जीवन विठ्ठलराव दरेगवे, अपक्ष

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण 5,534 उमेदवार निवडणूक लढवणार आहे. नांदेड जिल्ह्यातील भेकर मतदारसंघातून जास्तीत जास्त 135 उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.95 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तेथे 1.16 लाख सेवा मतदार आहेत. यंदा, निवडणूक आयोग महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार आहे.