मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 41 वेळची चॅम्पियन मुंबई आणि दोन वेळचा चॅम्पियन विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. दुसऱ्या डावात मुंबईने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दोन बाद 141 धावा केल्या. सध्या मुंबईकडे 260 धावांची आघाडी आहे. सध्या मुशीर खान (51) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (58) क्रीजवर आहेत. पृथ्वी शॉ 11 धावा करून बाद झाला तर भूपेन लालवानी 18 धावा करून लवकर बाद झाल्यावर मुंबईचा डाव संकटात आला होता. यानंतर रहाणे आणि मुशीरने तो सांभाळला. (हेही वाचा -  Mumbai Vs Vidarbha Ranji Trophy Final: यश ठाकूरच्या मॅजिकल बॉलवर पृथ्वी शाह क्लिन बोल्ड, पाहा Video)

मुंबईने दुसऱ्या दिवशी भेदक मारा करत विदर्भचा पहिला डाव 105 धावात संपुष्टात आणला. पहिल्या डावात 119 धावांची मोठी लीड मिळाल्यानंतर मुंबईने आता आपला दुसरा डाव सुरू केला आहे. मुंबईकडून सर्व गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. पहिल्या डावात मुंबईने 119 धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र यश ठाकूर आणि दुबेने पृथ्वी शॉ आणि भुपेन ललवानीला स्वस्तात बाद करत मुंबईला दोन धक्के दिले.

मुंबईचा कर्णधार असलेल्या अंजिक्य रहाणेचा फॉर्म यासामन्यात परतांना दिसला. दुसऱ्या डावात अंजिक्यने कर्णधार पदाला साजेशी अशी खेळी केली. त्यांने युवा फलंदाज मुशीर खानच्या सोबतीने 107 धावांची नाबाद भागीदारी रचली.  सध्या मुशीर खान (51) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (58) क्रीजवर आहेत.