जम्मू-काश्मीरमध्ये एम एस धोनी बनला 'पल दो पल का शायर', आपल्या गायकीने जिंकली चाहत्यांची मनं, पहा हा Video
MS Dhoni. File Image. (Photo Credits: Facebook)

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) भारतीय सैन्यासोबत देशाच्या संरक्षणामध्ये गुंतला आहे. धोनीला भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळाले आहे. आणि 31 जुलैपासून तो सैन्यात सेवा बजावत आहेत. धोनी सध्या दक्षिण काश्मीरमध्ये व्हिक्टर फोर्सचा एक भाग म्हणून कार्यरत आहे. आणि पुढील दोन आठवडे तो सैन्यासोबत देशाच्या सुरक्षेत कार्यरत असेल. धोनी 15 ऑगस्ट पर्यंत काश्मीर खोऱ्यात गस्त घालून असेल. काही दिवसांपूर्वी धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो भारतीय सैनिकांना ऑटोग्राफ देताना दिसत होता. आणि आता तो सैन्याच्या गणवेशात गाणे गाताना दिसत आहे. (Ind vs WI 1st T20I 2019: पहिल्या टी -20 सामन्यात भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर 4 गडी राखून दणदणीत विजय)

धोनीचा भारतीय सैन्याच्या गणवेशात गाणे गात असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये धोनी 'मैं पल दो पल का शायर हूं' हे गाणे गात असताना दिसत आहे. धोनीचा हा स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे आणि त्याचे खूप कौतुक देखील होत आहे. पहा हा व्हिडिओ: 

भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्याला न जात लष्करासोबत दोन महिने रहाण्याची धोनीने परवानगी मागितली होती, ती मान्य झाली आणि त्याची पहिली पोस्टिंग दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आली. वेस्ट इंडिज दौऱ्यावर धोनीच्या जागी युवा खेळाडू रिषभ पंत (Rishabh Pant) याची निवड करण्यात आली. पण वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात बॅटिंगमध्ये काही खास करू शकला नाही. आणि शून्यावर बाद झाला.