सुनील गावस्कर यांनी एमएस धोनी बद्दल केला मोठा खुलासा, माजी कर्णधार देशांतर्गत उड्डाणेांमध्ये क्वचितच बिझिनेस क्लासमधून जायचा
एमएस धोनी (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. असे असतानाही धोनी नेहमीच चर्चेत बनून राहीला आहे. मागील अनेक महिन्यांपासून धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरु आहेत, मात्र धोनीने स्वतः यावर भूमिका स्पष्ट केली नाही. आता माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी धोनीविषयी एक खुलासा केला आहे ज्याचा त्याच्या चाहत्यांनाही अभिमान वाटेल. भारतात होणार्‍या आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान दोन्ही संघ (भारतीय आणि परदेशी संघ) विशेष चार्टर्ड विमानाने प्रवास करतात. गावस्कर यांनी मिड-डेच्या कॉलममध्ये लिहिले की, "विमानात मर्यादित बिजनेस क्लासच्या जागा असतात ज्या सामान्यत: कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांसाठी राखीव असतात." भारतीय संघाने (Indian Team) गेल्या काही वर्षांत असा नियम बनविला आहे की, शेवटच्या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना बिझनेस क्लासमध्ये बसण्याची संधी मिळते. (5 वेळा जेव्हा महेंद्र सिंह धोनी ने क्रिकेटच्या मैदानावर गमावला ताबा, चिडलेल्या 'कॅप्टन कूल'ने अंपायर आणि खेळाडूंशी घातला आहे वाद)

कर्णधार असूनही धोनी क्वचितच बिझिनेस क्लासमध्ये प्रवास नाही करायचा. गावस्कर म्हणाले की, "टीव्ही चालक दल देखील या उड्डाणात प्रवास करतात ज्यांना पुढील सामन्यासाठी केबल लावावे लागतात. बिझिनेस क्लासमध्ये बसल्यानंतर धोनीने या रियल हिरो, कॅमेरामॅन आणि टीव्ही कव्हरेजच्या साऊंड इंजिनिअर्ससमवेत इकॉनॉमी क्लासमध्ये जाणे पसंत करायचा." गावस्कर म्हणाले की, धोनीनंतर आता विराट कोहली ही चांगली परंपरा कायम ठेवत आहे.

2018-19 च्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यादरम्यान उत्तम कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांना कोहलीने आपली बिझिनेस क्लास सीटही दिली होती.नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात भारताला विजयासाठी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांला कोहली आपली जागा बिजनेस क्लासमधील आपली सीट द्यायचा. गोलंदाजांना अधिक विश्रांती देण्यासाठी त्याने हे केले. त्याच्या पुढाकाराने संघातील एकता आणखी मजबूत झाली. शिवाय, कोहलीने या संघाचे नेतृत्व करण्यास त्याला किती अभिमान वाटतो हे वारंवार त्याने म्हणून स्पष्ट केले आहे.