Video: सैन्यात दाखल होण्यापूर्वी एमएस धोनीने लग्नाचे खरे महत्व पटवून देत दिले रोचक भाषण
एमएस धोनी (Photo Credit-PTI)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) लवकरच भारतीय सैन्यासोबत (Indian Army) काश्मीर येथे गस्त घालणार आहे. धोनीने टीम इंडियासोबत वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर न जाता भारतीय सैन्यासोबत दोन महिने व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी दोन महिने काश्मीरमध्ये असणार आहे आणि एक सामान्य सैनिकासारखं राहणार आहे. माही सामान्य सैनिकांप्रमाणेच असेल आणि दररोजची कामेही करेल. भारतीय सैन्यात दाखल होण्यापूर्वी एमएस धोनीने बेंगळुरू येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 38 वर्षीय धोनी पॅराशूट रेजिमेंटच्या टेरीटोरियल आर्मी युनिटमध्ये (106 पॅरा टीए बटालियन) लेफ्टनंट कर्नलच्या पदावर हजर आहे. 2011 मध्ये भारतीय सैन्याने त्यांचा सन्मान केला होता. (वेस्ट इंडिजच्या कॉट्रेलचा Lt Colonel एमएस धोनी याला ‘शेल्डन सॅल्यूट’; प्रेरणादायी म्हणून केला सम्मान, पहा हे Tweet)

दरम्यान, काश्मीरमध्ये सैन्यात भरती होण्यापूर्वी धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो विवाह आणि कौटुंबिक जीवनाविषयी बोलत आहे. धोनी 50 वर्षांनंतरच्या आयुष्याविषयी बोलत आहेत. "लग्नाची खरी गरज वयाच्या 50 व्या वर्षानंतरची होते. ही एक अशी वेळ असते जेव्हा मुले शाळा किंवा महाविद्यालयात जातात आणि हीच वेळ तुम्ही स्वतः घ्या." पहा हा व्हिडिओ:

दुसरीकडे, यंदाच्या विश्वचषकमध्ये धोनीच्या संथ खेळीमुळे त्याची टीका केली जात होती. चाहते आणि विशेषज्ञ याच्या निवृत्तीच्या चर्चा करू लागले होते. पण भारताच्या माजी कर्णधाराने निवृत्त न होता खेळातून थोडी विश्रांती घेतली आहे आणि सैन्यात सहभागी झाला आहे. 2015मध्ये आर्मीची एक परीक्षा देत धोनी पॅराट्रुपरची पात्रता मिळवली होती. त्याने आग्रा मधील प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण म्हणून सैन्याच्या विमानातून पाचवेळा पॅराशूटने उडी मारली.