माइकल वॉन यांनी निवडली 1960 ते 2010 दरम्यानची ऑल टाइम प्लेइंग XI; स्टिव्ह स्मिथ समवेत 'या' भारतीय क्रिकेटरचा समावेश
माइकल वॉन (Photo Credit: Getty Images)

इंग्लंडचा (England) माजी क्रिकेटपटू माइकल वॉन (Michael Vaughan) यांनी आपला आवडता ऑल टाइम प्लेइंग इलेव्हन निवडला. त्याने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सध्याच्या क्रिकेटर्सपासून 60 च्या दशकापर्यंतच्या खेळाडूंचा समावेश केला आहे. आणि मुख्य म्हणजे, त्याला प्रत्येक दशकातील दोनपेक्षा जास्त खेळाडूंना निवडण्याची परवानगी नव्हती. वॉन सध्या संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार झाल्यामुळे घरीच कैद झाले आहे. वॉनने या प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एका भारतीय (India) खेळाडूचा समावेश केला आहे. सुरुवातीस त्यांनी सर सर जेफ्री बॉयकोट यांना निवडले. त्यांनी इंग्लंडकडून खेळत 144 सामन्यात 9,000 धावा केल्या आहेत. त्यानंतर ते सर्वात लोकप्रिय भाष्यकर्तेही बनले. 70 च्या दशकापासून वॉन सर विवियन रिचर्ड्स आणि इयान बोथम यांना निवडले. उत्तरार्ध एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून उभारले असले तरीरिचर्ड्सकडेगोलंदाजीत सर्वोत्कृष्ट प्रभाव पडण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. 80 च्या दशकापासून वॉनने सचिन तेंडुलकर याचा समावेश केला. 90 च्या दशकापासून मास्टर ब्लास्टरला प्रसिद्धी मिळाली असली तरी 1989 मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध डेब्यू केले होते.

त्याच दशकापासून वॉनने वसीम अकरम यांचीही निवड केली. अकरम सर्व फॉर्मेटमध्ये पाकिस्तानचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहेत. अकरम स्वत:च्या वेगाने स्विंग निर्माण करू शकणारे गोलंदाज होते. 90 च्या दशकापासून अ‍ॅडम गिलक्रिस्ट वॉनची निवड बनला. तो एक विकेटकीपर आणि मोठे शॉट्स खेळणारा फलंदाज होता. 1999, 2003 आणि 2011 मध्ये तो ऑस्ट्रेलियन विश्वचषक विजेत्या संघाचा देखील एक भाग होता. शेन वॉर्न 90 च्या दशकात वॉनची दुसरी निवड आहे. 2000 च्या दशकातून वॉनने ग्रीम स्मिथ आणि जेम्स अँडरसन यांना निवडले. अँडरसन हा कसोटी क्रिकेटमधील इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे. 2010 च्या दशकातून वॉनने पॅट कमिन्स आणि स्टिव्ह स्मिथ यांची निवड केली. कमिन्स आणि स्मिथ आयसीसीच्या टेस्ट बॉलिंग आणि फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत.

माइकल वॉनचे इलेव्हन:

जेफ्री बॉयकॉट, ग्रीम स्मिथ, स्टिव्ह स्मिथ, विव रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, एडम गिलक्रिस्ट, इयान बॉथम, वसीम अकरम, शेन वार्न, पॅट कमिन्स, आणि जेम्स अँडरसन.