India A vs West Indies A ODI Series: वेस्ट इंडिज ए संघाला 148 धावांनी पराभूत करत इंडिया ए ने लावली विजयाची हॅट-ट्रिक
मनीष पांडे (Photo Credits: Getty Images)

कर्णधार मनीष पांडे (Manish Pandey) यांचे शतक आणि फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या (Krunal Pandya) ने घेतलेल्या पाच विकेट्स च्या जोरावर भारत ए (India A) संघाने अनौपचारिक वनडे सामन्यात वेस्ट इंडीज ए (West Indies A) संघाला 148 धावांनी पराभूत केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. टॉस जिंकत भारतीय संघाने पहिले फलंदाजी करत 50 षटकात 6 गडी राखून 295 धावा केल्या. त्यानंतर 34.2 षटकात यजमान संघाला केवळ 147 धावांवर रोखले. दरम्यान, भारतीय संघाची सुरुवात चांगली नाही झाली. सलामीवीर अनमोलप्रीत सिंह (Anmolpreet Singh) शून्य धावा करत माघारी परतला. सलामीला आलेला शुभमन गिल (Shubhman Gill) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. गिलने 81 चेंडूत 77 धावा केल्या तर श्रेयसला 69 चेंडूत 47 धावा करता आल्या.

गिल बाद झाल्यावर आलेल्या पांडेने 87 चेंडूत 100 धावा केल्या. त्याने चौथ्या विकेटसाठी हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत पांडेने 110 धावांची भागीदारी केली आणि संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. तर भारत ए संघाने दिलेल्या 296 लक्ष्यांचा पाठलाग करत वेस्टइंडीज ए जे जॉन कॅम्पबेल (John Cambell) आणि सुनील एम्ब्रिस (Sunil Ambris) यांनी 51 धावांची भागीदारी केली.कॅम्पबेल ने 21 तर एम्ब्रिसने 30 धावा केल्या.

भारतासाठी कृणाल पंड्या ने 25 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आणि पूर्ण वेस्ट इंडिज ए संघ 150 पेक्षा कानी धावांत ऑल-आऊट झाला. खालच्या क्रमांकावर खेळायाला आलेल्या किमो पॉलने (Keemo Paul0 34 धावा केल्या पण तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. याआधी, भारत ए ने 11 जुलै रोजी कूलिजमध्ये 65 चेंडूत पहिला सामना जिंकला होता, तर 14 जुलै रोजी नॉर्थ साऊंडमध्ये झालेला दुसरा देखील सामना समान फरकाने जिंकला होता. या मालिकेतील शेवटचे दोन सामने शुक्रवारी व रविवारी कूलिज येथे खेळले जातील.