मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 241 धावांच्या प्रत्युत्तरात विंडीजला निर्धारित ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावाच करता आल्या. विंडीजकडून कर्णधार किरोन पोलार्ड याने सर्वाधिक 68 धावा केल्या, तर शिमरोन हेलमेयर याने 41 धावांचे योदान दिले. 

15 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने भारताला मोठे यश मिळवून दिले.भुवीने 68 धावांवर खेळणाऱ्यापोलार्डला पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. पोलार्डने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि भुवीच्या चेंडूवर मोठ्या शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो जडेजाच्या हाती झेलबाद झाला. 

कुलदीप यादवच्या चेंडूवर चौकारांसह पोलार्डने आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाला विजयासाठी अजून 102‬ धावांची गरज आहे.  कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे पहिले अर्धशतक आहे. 

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने जेसन होल्डरला पॅव्हेलियनमध्ये परतवून टीम इंडियाला पाचवे यश मिळवून दिले आहे. पाच चेंडूंचा सामना करत त्याने एका चौकारच्या मदतीने 8 धावा केल्या.

कुलदीप यादवने वेस्ट इंडिजची मजबूत भागीदारी मोडली. शिमरोन हेटमेयर 41 धावांवर केएल राहुलकडे झेलबाद केले. हेलमेयरने 41 धावा केल्या. 

भारताने 241 धावांचे लक्ष्य राखून वेस्ट इंडीज संघाने आठ षटकांनंतर तीन गडी गमावून 68 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कर्णधार पोलार्ड आणि हेटमेयर यांच्यात आतापर्यंत 51 धावांची भागीदारी झाली आहे.

भारताच्या 241 धावांच्या उद्घाटनासमोर पाहुणा संघ वेस्ट इंडीजने पहिला पॉवरप्ले संपल्यानंतर तीन गडी गमावून 41धावा केल्या. संघाकडून कर्णधार केरॉन पोलार्ड 8 आणि शिमरन हेटमीयर 15 धावांवर खेळत आहे. वेस्ट इंडीजचे फलंदाज लेंडल सिमन्स 7, ब्रेंडन किंग 5 आणि यष्टीरक्षक निकोलस पूरण 0 धावांवर बाद झाले. 

भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चहरने निकोलस पूरनला पॅव्हेलियन परतवून संघाला तिसरे यश मिळवून दिले आहे. पूरन खाते न उघडताच चहरच्या चेंडूवर शिवम दुबेकडे झेलबाद झाला. 

भारतासाठी तिसरी ओव्हर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने टाकली. शमीने त्याच्या षटकात केवळ एक धाव देत वेस्ट इंडीजचा सलामीवीर लेंडल सिमन्सची विकेट घेतली. सिमन्सने आज 1 चौकारांच्या मदतीने 11 चेंडूत 5 धावा केल्या.

भारताने दिलेल्या 241 धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजला 12 धावांवर भुवनेश्वर कुमार ने पहिला झटका दिला. भुवीने ब्रॅन्डन किंगला 5 धावांवर केएल राहुल कडे कॅच आऊट केले. दुखापतीतून पुनरागमन केलेल्या भुवीचीही पहिली विकेट ठरली. 

Load More

भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील टी-20 सामना रोचक झाला आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) आज अखेरचा आणि निर्णायक सामना खेळला जाईल. थोड्याच वेळात टॉस होईल. वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजने आजवर एकही सामना गमावलेला नाही आहे, शिवाय त्यांची तयारीही पूर्ण आहे. भारतीय संघाची (Indian Team) गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मागील दोन्ही सामन्यात खराब होते, त्यामुळे सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी संघाला सर्व श्रेतात उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. फलंदाजी ही भारतासाठी कधीच समस्या नव्हती. सलामी फलंदाज रोहित शर्मा मागील दोन्ही सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला होता पण आता त्याला होम ग्राऊंडवर मोठा डाव खेळायची संधी आहे. केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. शिवाय, मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या शिवम दुबे याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असतील. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय संघात युवा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर आणि यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत खराब फॉर्मशी झुंज देत आहेत. टीम मॅनेजमेंट सुंदरला संघात कायम ठेवते की कुलदीप यादव याला संधी मिळते हे पाहणे बाकी आहे.सुंदरने वेस्ट इंडीजविरुद्ध दोन आणि बांग्लादेशविरूद्ध तीन सामन्यात23 ओव्हरमध्ये 144 धावा लुटवल्या. दुसरीकडे, कुलदीपने अंतिम टी-20 सामनाफेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टनमध्ये खेळला होता.भारताची गोलंदाजीही चिंतेचे कारण आहे. दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी पहिल्या दोन सामन्यात सर्वाधिक धावा लुटवल्या आहेत. दोन्ही संघातील मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे आणि अंतिम स्पर्धा थरारक असावी अशी अपेक्षा आहे.

असे आहे भारत आणि विंडीज संघ:

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मनीष पांडे, केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

वेस्ट इंडीज: किरोन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, फॅबियन एलन, शेल्डन कोटरेल, शिमरोन हेटमेयर, जेसन होल्डर, ब्रॅंडन किंग, एव्हिन लुईस, किमो पॉल, खेरी पियरे, दिनेश रामदिन (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, लेंडल सिमंस, केसरीक विल्यम्स, हेडन वाल्श जूनियर.