IND vs SL 3rd T20I 2020 Match Live Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
विराट कोहली, लसिथ मलिंगा (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील तीन टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना शुक्रवारी पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. गुवाहाटीमध्ये पावसामुळे पहिला सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या सामन्यात भारताने श्रीलंकेला 7 विकेट पराभूत केले. दोन्ही संघ पुण्यात दुसऱ्यांदा आमनेसामने असतील. यापूर्वी 2016 मधील अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताला 5 विकेटने पराभूत केले होते, तर टीम इंडियाने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध 5 विकेटने विजय नोंदवला होता. भारतीय संघाला सामना जिंकून श्रीलंकाविरुद्ध सहावी मालिका जिंकण्याचीही संधी आहे. यापूर्वी दोन्ही संघांमधील सहा मालिकांमध्ये टीम इंडियाने पाचमध्ये विजय मिळवला आहे, तर 2009 मधील मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. 2017 मध्ये भारताने श्रीलंकाविरुद्ध शेवटची मालिका 3-0 ने जिंकली होती. (IND Vs SL 3rd T20I: भारत विरूद्ध श्रीलंका तिसरा टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता)

भारत-श्रीलंकामधील तिसरा टी-20 सामना शुक्रवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजेपासून खेळला जाईल, तर संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होईल. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवर पाहू शकता.

या सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टी-20 मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होऊ शकतो. त्याने आजवर 44 सामन्यांत 52 गडी बाद केले आहे. देशासाठी या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक 52 विकेट्स घेत युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासह बुमराह संयुक्त रूपात पहिल्या स्थानावर आहे. मागील सामन्यात चार महिन्यांनंतर बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने इंदोर सामन्यात एक विकेट घेत अश्विन आणि चहलची बरोबरी केली होती.

असा आहे भारत-श्रीलंका संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सैमसन, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशादा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.