चेन्नई वनडे सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 288 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने विकेटने 8 विजय मिळवला. या विजयासह विंडीजने 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे.  शिमरोन हेलमेयर आणि शाई होप यांनी विंडीजच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या पराभवासह भारताची खराब गोलंदाजी आणि फिल्डिंग पुन्हा एकदा समोर आली. भारताकडून दीपक चाहर आणि मोहम्मद शमी यांनांच विकेट घेण्यात यश आले. चाहर आणि शमीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. 

चेन्नई वनडे सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 288 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने विकेटने 8 विजय मिळवला. या विजयासह विंडीजने 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे.  शिमरोन हेलमेयर आणि शाई होप यांनी विंडीजच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या पराभवासह भारताची खराब गोलंदाजी आणि फिल्डिंग पुन्हा एकदा समोर आली. भारताकडून दीपक चाहर आणि मोहम्मद शमी यांनांच विकेट घेण्यात यश आले. चाहर आणि शमीने प्रत्येकी 1 गडी बाद केला. 

दीपक चाहर च्या ओव्हरमधील चेंडूवर चौकार मारत शाई होपने आठवे वनडे शतक पूर्ण केले. होपने या शतकी खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. 

टीम इंडियाकडून शिवम दुबेने 43 वे ओव्हर टाकली. दुबेच्या या षटकात कॅरेबियन फलंदाजांनी चार एकेरींच्या मदतीने एकूण चार धावा फटकावल्या. विजयासाठी संघाला आता 42 चेंडूंत 44 धावांची गरज आहे.

मोहम्मद शमी ने भारताला दुसरे महत्वाचे यश मिळवून दिले. विंडीजसाठी शतकी खेळी करणाऱ्या शिमरॉन हेटमेयरला शमीने श्रेयस अय्यरकडे कॅच आऊट केले. हेटमेयरने 139 धावा केल्या.

शिमरोन हेटमेयर आणि शाई होप यांची भागीदारी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरली आहे. विंडीजच्या या जोडीने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले आहे. दोंघांमध्ये 201 चेंडूत 200 धावांची भागीदारी झाली आहे. होप 70 आणि हेटमेयर 129 धावांवर खेळत आहे. विंडीजला जिंकण्यासाठी अजून 66 धावांची गरज आहे. 

दीपक चाहर च्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्लोअर चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू जास्त लांब गेला नाही आणि सीमारेषे जवळ असलेल्या श्रेयस अय्यर च्या हातात आला, पण पंतने सहज झेल सोडला. टीम इंडियाची खराब फिल्डिंग पुन्हा एकदा चर्चत आली आहे. 

टीम इंडियाविरुद्ध प्रभावी कामगिरी करत शिमरोन हेटमेयर याने वनडे कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. हेटमेयरने 85 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारत शतक पूर्ण केले. हेटमेयरचे टीम इंडियाविरुद्ध हे दुसरे वनडे शतक आहे. 

वेस्ट इंडिजचा सलामीवीर शाई होपने चांगली फलंदाजी करताना एकदिवसीय क्रिकेटमधील 15 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. होप सध्या तीन चौकारांच्या मदतीने 92 चेंडूत 50 धावा करून खेळत आहे.

लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने दीडशे धावा पूर्ण केल्या आहेत. विजयासाठी संघाला आता 23.2 षटकांत 138 धावांची आवश्यकता आहे. शिमरोन हेटमेयर त्याच्या शतकाच्या जवळ पोहचला आहे. सध्या हेटमेयर 76 चेंडूत 92 धावांवर खेळत आहे. 

Load More

चेन्नईचे एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. चेन्नईतील (Chennai) हे स्टेडियम चेपाक म्हणूनही ओळखले जाते. येथे वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा विक्रम खूप प्रभावी राहिला आहे. दोन्ही संघ विजयासह मालिका सुरू करू इच्छित आहेत. सामन्यापूर्वी अनुभवी भुवनेश्वर कुमार जखमी झाल्याने टीम इंडियाची गोलंदाजी खूपच कमकुवत दिसत आहे. संघात मोहम्मद शमी, दीपक चहर, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांच्या रूपात चार वेगवान गोलंदाज आहेत. टी-20 मालिकेनंतर वनडे मालिका विजयासाठीदेखील टीम इंडिया मुख्य दावेदार मानली जात आहे. पण, वेस्ट इंडिजने ज्याप्रकारचे खेळ दुसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात केले ते पाहून टीम इंडियाला त्यांच्यापासून सावध राहायची गरज आहे. या मालिकेत टीम इंडियाला भुवनेश्वरसह सलामी फलंदाज शिखर धवन याचीही कमतरता जाणवेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

शिखरच्या जागी टेस्ट सलामी फलंदाज मयंक अग्रवाल याला स्थान मिळाले आहे, पण त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळते कि केएल राहुल यालाच सलामीला पाठवले जाते, हे पाहणे उत्साहाचे ठरेल. दुसरीकडे, विंडीज संघ विजयाने मालिकेची सुरुवात करू पाहिलं. भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघाच्या फलंदाजीने टी-20 मालिकेत चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले आणि भारतीय संघाला त्यांच्याच घरी खेळताना झुंजही दिली. त्यामुळे, प्रभावी खेळी करण्यावर विंडीज संघाचे प्रयत्न असतील. या संघाचे क्षेत्ररक्षणही उत्तम आहे. पण, त्यांना गोलंदाजीवर लक्ष द्यावे लागणार आहे.

असा आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस, शाई होप, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलज़ारी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.