स्वर्गीय जगमोहन डालमिया यांचा मुलगा अविशेक 38 व्या वर्षी बनला CAB चा सर्वात युवा अध्यक्ष, सौरव गांगुली चे मोठे बंधू स्नेहासिश सचिव
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासमवेत अविशेक डालमिया (Photo Credit: ANI)

एकेकाळातील प्रसिद्ध क्रिकेट प्रशासक स्वर्गीय जगमोहन डालमिया यांचे पुत्र अविशेक (Avishek Dalmiya) यांची काळ वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी (CAB) निवड झाली आहे. दुसरीकडे, सध्याचे बीसीसीआय अधित्यक्ष सौरव गांगुली यांचे थोरले बंधू स्नेहासिश गांगुली (Snehasish Ganguly) यांची कॅबचे नवीन सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 38 वर्षांचा अभिषेक सीएबीचा सर्वात कमी वयाचा अध्यक्ष आहे. अविशेक कॅबचा 18 वा अध्यक्ष बनला आहे, तर त्याच्या वडिलांनी दोनदा हे पद भूषविले आहे. भारताचा माजी कर्णधार गांगुलीने बीसीसीआयची सत्ता हाती घेतल्यानंतर कॅब अध्यक्षपदाचे पद रिक्त होते. पण, लोधा यांनी सुमारे 22 महिन्यांचा कार्यकाळ देण्यासंबंधी घटनेची शिफारस केली आहे. त्यानुसार अविशेक 6 नोव्हेंबर 2021 रोजी कूलिंग ऑफ अवधीसाठी पदभार सांभाळतील.

गांगुली अध्यक्ष असताना अभिषेक कॅबचा सेक्रेटरी होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. दरम्यान, सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष गांगुलींचे मोठे बंधू स्नेहशीश बंगालकडून रणजी क्रिकेट खेळले आहेत. त्याने कारकीर्दीत एकूण 59 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने सहा शतक आणि 11 अर्धशतकांच्या सहाय्याने 2534 धावा केल्या. टी-20 विश्वचषक (2021) आणि वनडे विश्वचषक (2023) या दोन जागतिक स्पर्धेचे आयोजन तीन वर्षांत करण्यात येणार असल्याने कॅबच्या नव्या अध्यक्षपदाची प्राथमिकता संरक्षण मंत्रालयाकडे ईडन गार्डन्स लीजचे नूतनीकरण करण्यावर असेल.

दुसरीकडे, सीएबी लवकरच आठ-संघीय महिला क्लब लीग आणि खेळाडूंसाठी आचारसंहिता आणण्याची योजना आखत आहे. बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक दिंडाला या रणजी हंगामाच्या सुरुवातीला गोलंदाजीचे प्रशिक्षक रणदेवब बोस यांना शिवीगाळ केल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्याचा विचार केला जात आहे.