Kismat Acha Hai: सनबाथ घेणाऱ्या सचिन तेंडुलकर ची सौरव गांगुली ने घेतली फिरकी, टिप्पणीने यूजर्सना झाले हसू अनावर
सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर (Photo Credit: Twitter/Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हे क्रिकेटमधील एक जबरदस्त खेळाडू मानले जाते, परंतु सोशल मीडियावरील त्यांची विचित्र पोस्ट्स लक्ष वेधून घेते. गांगुली आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांची जोडी क्रिकेटच्या प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. दोघांनीही क्रिकेट क्षेत्रात अनेक धावा आणि विक्रम नोंदवले आहेत. आजही क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी जोडीची आठवण केली जाते तेव्हा सचिन-सौरवचे नाव सर्वात पहिले सर्वांच्या लक्षात येते. दोघांनी निवृत्ती जाहीर केली असली तरी दोघे आपापल्या पद्धतीने योगदान देत आहे. हे दोन्ही दिग्गज आजकाल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि यांच्यासह चाहत्यांशी संपर्क साधतात. सचिन सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे जिथे तो बुशफायर चॅरिटी क्रिकेट सामन्यात भाग घेतल्यानंतर सुट्टीचा आनंद घेत आहे. सचिनने सुट्टी दरम्यानचा फोटो शेअर केला ज्याच्यावर गांगुलीने एक मजेदार कमेंट केली. (Video: सचिन तेंडुलकर याने 5 वर्षानंतर केली बॅटिंग; बुशफायर बॅशमध्ये एलिसे पेरी, अ‍ॅनाबेल सदरलँडविरुद्ध दाखवला दम)

फोटो शेअर करत सचिनने लिहिले की, 'मी सनबॅथिंग करतोय'. यावर प्रतिक्रिया देताना गांगुलीने लिहिले की, 'एखाद्याची किस्मत चांगली आहे... सुट्टी साजरी करत रहा'. गांगुलीच्या या टिप्पणीमुळे बऱ्याच जणांना हसू अनावर झाले. पाहा ही पोस्ट:

 

View this post on Instagram

 

Soaking up the Sun 🌞!

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

(Photo Credit: Instagram)

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी मास्टर ब्लास्टर सचिनने जवळजवळ साडेपाच वर्षानंतर बॅट पकडली. सचिनने रविवारी ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागले आग पीडितांच्या मदतीसाठी पैसे गोळा करण्यासाठी खेळलेल्या सामन्याच्या दोन डावांच्या ब्रेक दरम्यान एक ओव्हर फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा सुपरस्टार अष्टपैलू एलिसे पेरीने सचिनला एक ओव्हर फलंदाजी करण्याचे आव्हान दिले होते, जे त्याने स्वीकारले.