Kapil Dev यांनी निवडली 'कपिल XI' टीम; विराट कोहली, एमएस धोनीसह दिग्गजांचा केला समावेश
वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) म्हणाले की, महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) जागा कोणीही घेऊ शकत नाही. कपिल यांनी अलीकडेच 'कपिल इलेव्हन' (Kapil XI) ची निवड केली आणि त्यात 2011 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा समावेश केला. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात क्रिकेटचा पहिला वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) त्यांच्या विजयाची पुनरावृत्ती करत 2011 मध्ये ही कमाल केली. कपिल आणि धोनी हे एकमेव दोन कर्णधार राहिले आहेत ज्यांनी भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. देव यांच्या मनातील धोनीबद्दलचा आदर कोणासाठीही रहस्य नाही आणि कपिलने नेहमीच माजी यष्टिरक्षक फलंदाजाचे कौतुक केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियासोबत ‘No Filter Neha’ या चॅट शोमध्ये हजेरी लावताना कपिल यांनी ‘कपिल इलेव्हन’ निवडण्यास सांगितले. माजी कर्णधाराने आपल्या स्टार-स्टॅड इलेव्हन निवडली आणि धोनीला विकेटकीपर म्हणून स्थान दिले. (MS Dhoni पत्नी साक्षी, कन्या झिवा यांच्यासोबत वेकेशन मोडवर, IPL 2020 नंतर दुबई येथे घेतोय सुट्टीचा आनंद; पहा Photos आणि Videos)

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, झहीर खान आणि सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांचीही त्यांनी निवड केली. संघात धोनीच्या जगेला कुणालाही स्पर्श करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यंदा ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा करणारा धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहणार आहे. यंदाचा 2020 हंगाम सीएसकेसाठी निराशाजनक ठरला आणि ते पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकले नाही. कपिल म्हणाले की, कसोटी आणि वनडे सामन्यांमध्ये खूप फरक आहे आणि जर ते वनडे सामन्यांबाबत बोलायचे तर सचिन, सेहवाग, विराट, राहुल द्रविड, युवराज माझ्या संघात असतील. माझ्या संघात यष्टीरक्षक म्हणून फक्त धोनी तिथे असेल आणि कोणीही त्याची जागा घेऊ शकत नाही. नंतर त्यांनी झहीर, श्रीनाथ आणि जसप्रीत बुमराहला संघात वेगवान गोलंदाज म्हणून निवडले. फिरकीपटू म्हणून त्यांनी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांना संघात घेतले.

पाहा कपिल देव यांची 'कपिल XI': सचिन तेंदुलकर, वीरेंद्र सहवाग, विराट कोहली, राहुल द्रविड़, युवराज सिंह, एम एस धोनी, अनिल कुंबळे, हरभजन सिंह, झहीर खान, श्रीनाथ आणि जसप्रीत बुमराह.