SL vs NZ Warm-Up मॅच दरम्यान चाहत्यांसोबत मैदानावरच सेलीब्रेट केला केन विल्यमसन याने 29 वा वाढदिवस, पहा Video
(Photo Credit: @OfficialSLC/Twitter)

न्यूझीलंड (New Zealand) संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. विश्वचषकच्या फायनलमधील पराभव विसरून किवी संघ पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिका खेळण्यास सज्ज आहे. पण त्याआधी श्रीलंका (Sri Lanak) आणि किवी संघात एक सराव सामना खेळण्यात आला. आज न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याचा 29 वा वाढदिवस आहे. आणि आजचा दिवस त्याच्यासाठी स्पेशल बनवला तो त्याच्या चाहत्यांनी. विल्यमसन आज 29 वर्षांचा झाला आणि श्रीलंकेच्या चाहत्यांनी क्रिकेटरशी जुळण्यासाठी खास मार्ग शोधला. गुरुवारी झालेल्या सराव सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या चाहत्यांनी विल्यमसनसाठी केक आणला आणि किवी कर्णधाराने चाहत्यांची निराशा केली नाही. आणि त्याने चाहत्यांकडे जाऊन त्यांच्याबरोबर केकचा तुकडा खाल्ला.

याबाबतचा एक फोटो श्रीलंका क्रिकेटने शेअर केला. यात त्यांनी कॅप्शन देत लिहिले, "वाढदिवस साजरा करण्याचा काय मार्ग निवडला आहे! वॉर्म-अप सामान्यादरम्यान श्रीलंकेच्या चाहत्यांनी केकचा तुकडा खाऊन केन विल्यमसन आपला 29 वा साजरा केला!@BLACKCAPS."

दरम्यान, न्यूझीलंड संघ 14 ऑगस्टपासून श्रीलंका विरुद्ध दोन सामन्यांची टेस्ट मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. पण त्या मालिकेआधी न्यूझीलंड गुरुवारपासून सुरू झालेल्या श्रीलंका बोर्डाच्या अध्यक्ष इलेव्हन विरूद्ध 3-दिवसीय सराव सामना खेळणार आहे. भारताचा फलंदाज शिखर धवन याने विल्यमसनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ट्विट केलेः 'एक दुर्मिळ फलंदाज जो कोणत्याही प्रकारच्या खेळात फलंदाजी करू शकतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा # केनविलियमसन.' विल्यम्सन आणि धवन हे दोघे आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादसाठी काही सीजन एकत्र खेळले होते.