पृथ्वी शॉ याच्या बंदी विषयी जोफ्रा आर्चर याला होती पर्व सूचना? त्याचे हे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
क्रिकेट विश्वचषकमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळीने इंग्लंड संघाला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात महतवाची भूमिका बजावणारा जोफ्रा आर्चर सध्या आपल्या एका जुन्या भविष्यवाणीमुळे चर्चेत आला आहे. पृथ्वी डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्याने बंदी घातल्यानंतर आर्चरचे जुने ट्विट 'अनलकी शॉ' सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळीने इंग्लंड (England) संघाला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात महतवाची भूमिका बजावणारा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) सध्या आपल्या एका जुन्या भविष्यवाणीमुळे चर्चेत आला आहे. आर्चर याने 2013 ते 2015 पर्यंत अशे काही ट्वीट्स आहेत विश्वचषक दरम्यान खरे ठरले आहेत. आर्चरने 14 एप्रिल 2013 रोजी एक ट्विट केले होते, यात त्याने 6 चेंडूत 16 धावा लिहिल्या होत्या. नंतर 5 जुलै 2015 रोजी त्याने फक्त सुपर-ओव्हर लिहून एक ट्विट केले. त्यानंतर आर्चरने परत एक ट्विट केले होते आणि यात त्याने लिहिले की सुपर ओव्हरमध्ये त्याला कोणतीही अडचण नाही. (Doping संदर्भात बंदीनंतर पृथ्वी शॉ याने दिले स्पष्टीकरण, सांगितली चूक कुठे झाली)
अर्चरच्या या ट्विटच्या मालिकेत आज भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे नाव शामिल झाले आहेत. डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्याने बंदी घातल्यानंतर आर्चरचे जुने ट्विट 'अनलकी शॉ' सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. आर्चरने हे ट्विट मॅन्चेस्टर युनायटेड (Manchester United) फुटबॉलर ल्यूक शॉ (Luke Shaw)जखमी झाला होता तेव्हा केले होते. पण इंटरनेट यूजर्स याचा अर्थ पृथ्वीशी जोडत आहेत. अर्चरच्या या ट्विटवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहे. काही लोक त्याला ज्योतिषी तर काही आधुनिक काळातील नास्त्रेदमस देखील म्हणत आहेत.
भावा इंडियाची कुंडली पाहण्यास प्रारंभ कर
जोफ्राडामस
असे काही आहे, ज्याबद्दल या व्यक्तीने ट्विट केलेले नाही? मला असं वाटत नाही
कॅरिबियन मूळचा आर्चर याच्यासाठी हा विश्वचषक संस्मरणीय होता. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या वतीने खेळण्यास आर्चर पात्र ठरला होता. ईसीबीने त्याला इंग्लंड संघात खेळण्याची संधी दिली आणि आर्चरने त्यांना निराश केले नाही. आर्चरने विश्वचषकमध्ये 11 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या. विश्वचषक स्पर्धेदरम्यान, कर्णधार इयन मॉर्गन सामन्यात जेव्हा मुश्किलीत अडकायाचा तेव्हा तो चेंडू आर्चरला देण्याचा आणि वेगवान गोलंदाजाने देखील आपल्या कर्णधाराला निराश होऊ दिले नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)