जसप्रीत बुमराह याच्यावर Joker चा प्रभाव, हीथ लेजर चा प्रसिद्ध डायलॉग लिहीत लंडनमधील फोटो केला शेअर
जसप्रीत बुमराह (Photo Credit: Instagram)

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या पाठोपाठ यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) देखील लंडन पोहचला आहे. हार्दिकने शनिवारी सोशल मीडियावर फोटो शेअर त्याच्या लोअर बॅकवरील शास्त्रक्रियेबद्दल सांगितले. दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध टी-20 मॅचदरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती. त्यानंतर, शनिवारी लंडनमध्ये त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आणि आता बुमराहदेखील लंडनमध्ये दाखल झाला आहे. बुमराहच्या कंबरेत फ्रैक्चर झाल्यामुळे त्याला आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेला मुकावे लागले. आणि आता तो लंडनमध्ये डॉक्टरांशी सल्ला घेण्यासाठी पोहचला आहे. लंडनमधून बुमराहने एक फोटो शेअर केला आहे जो की चर्चेत आला आहे. पण, ते ताच्या कॅप्शनमुळे. वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेदरम्यान बुमराहला पाठीला दुखापत जाणवली होती आणि मागील महिन्यात रेडिओलॉजिकल स्क्रीनिंग दरम्यान त्याची दुखापत समोर आली. (लंडनमध्ये हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या दुखापतीवर झाली शस्त्रक्रिया, सोशल मीडियावर फोटो केला शेअर)

बुमराहने लंडनमधील फोटो शेअर करत बॅटमॅन चित्रपटातील जोकर हीथ लेजर याचा प्रसिद्ध डायलॉग 'व्हाय सो सिरिअस' शेअर केला. या फोटोमध्ये बुमराह एका घराबाहेर उभा राहिलेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Why so serious? 😂😂

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

दरम्यान, यापूर्वी बीसीसीआयच्या कार्यकारिणीने बुमराहच्या दुखापतीबाबत पुष्टी करत सांगितले होते की, बुमराह डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी एक आठवडाइंग्लंडमध्ये थांबेल. संघ व्यवस्थापनाशी संबंधित एका सूत्रांनी सांगितले की, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री बुमराहला खेळवण्याची घाई करण्याची इच्छा नाही आणि बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. नोव्हेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या टेस्ट मालिकेतदेखील बुमराहचा भारतीय संघात समावेश होणे कठीण दिसत आहे.