IPL: KKR चं कर्णधारपद देताना दिलेलं वचन फ्रँचायझी मालक शाहरुख खानने पाळले नाही, सौरव गांगुली यांचा दावा
सौरव गांगुली, शाहरुख खान (Photo Credit: Getty)

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) कोलकाता नाइट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्याबद्दल एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे. गांगुली 2008 दरम्यान कोलकाताच्या कर्णधारपदी राहिला. बॉलीवूड सुपरस्टारने गौतम गंभीरला इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) फ्रँचायझीचा कर्णधार म्हणून जितके स्वातंत्र्य दिले तेवढेच स्वातंत्र्य त्याने दिले नाही असा दावा गांगुलीने केला. भारतीय राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना त्याला ज्या प्रकारचे यश मिळाले होते ते त्याला आयपीएल टीमचे कर्णधार म्हणून मिळाले नाही. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असलेले 48 वर्षीय गांगुलीने स्पष्ट केले की, सुरुवातीच्या हंगामात केकेआरची खरी समस्या प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी संघात अनेक कर्णधार असण्याचा आग्रह धरला होता आणि त्याने संघाला त्याच्या मार्गाने घेऊन जाण्याची स्वातंत्र्य देण्याची विनंती शाहरुखकडे केली होती. (Sourav Ganguly On Being Dropped: 'फक्त ग्रेग चॅपेलला दोष देऊ शकत नाही', 15 वर्षानंतर सौरव गांगुली यांनी भारतीय संघातून वगळण्याबाबत केला धक्कादायक खुलासा)

“मी एक मुलाखत पाहत होतो, जिथे गौतम गंभीर म्हणाला की शाहरुखने त्याला सांगितले होते‘ ही तुमची टीम आहे, मी हस्तक्षेप करणार नाही. हेच मी पहिल्या वर्षात त्याला सांगितले. माझ्यावर सोड, पण तसे झाले नाही. तेव्हा सर्वोत्तम खेळाडू आमच्याकडे होते," गांगुलीने youTube मुलाखतीत म्हटले. चेन्नई सुपर किंग्जचा एमएस धोनी आणि मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा यांच्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, “सर्वोत्कृष्ट फ्रेंचायझी ती आहे ज्यांनी निर्णय खेळाडूंवर सोपवला आहे.”

गांगुलीने भारताकडून 113 कसोटी आणि 311 वनडे समाने खेळले. गांगुलीकडून निराशाजनक कामगिरीनंतर केकेआरने गंभीरला 11.4 कोटी रुपयांत खरेदी केले आणि कर्णधारपद सोपवले. गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने दोनदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर 2018 मध्ये फ्रँचायझीने गंभीरला रिलीज केले आणि 7.4 कोटी रुपयांत दिनेश कार्तिकला संघात सामील केले. गांगुलीच्या नेतृत्वात कोलकाताने 27 पैकी 13 सामन्यात विजय मिळवला तर गंभीरच्या नेतृत्वात 69 सामन्यांमध्ये टीम विजयी ठरली.