IPL 2022: वेगवान चेंडू, अचूक वेध; उमरान मलिक याच्याप्रमाणेच 'हे' दिग्गज भारतीय गोलंदाजही आहेत वेगाचे बादशाह
उमरान मलिक (Photo Credit: PTI)

Fastest Indian Bowlers: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) भारतीय वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याने यंदा आपल्या अफलातून कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2022 मोसमात आपण अनेक तरुण खेळाडूंना दमदार कामगिरी करताना पाहिले आहेत आणि त्यापैकी एक उमरान मलिक आहे, जो आयपीएल (IPL) 2022 च्या लिलावापूर्वी कायम ठेवलेल्या अनकॅप्ड भारतीय खेळाडूंपैकी एक होता. सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीसाठी उमरानने या हंगामात प्रत्येक सामन्यात वेगवान भारतीय गोलंदाजाचा पुरस्कार जिंकला आहे. जम्मू-काश्मीरचा हा युवा खेळाडू आता देशातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक बनला आहे, तर भारताने आतापर्यंत तयार केलेल्या काही वेगवान गोलंदाजांवर एक नजर टाकूया. लक्षणीय आहे की ही यादी ICC ने स्पीड ट्रॅकिंग यंत्र आणल्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या क्रिकेटपटूंची आहे. (IPL 2022: हैदराबादच्या वेगाचा बेताज बादशाह Umran Malik याच्या अभूतपूर्व कामगिरीवर काँग्रेस नेते शशी थरूर यांचे रोखठोक मत)

1. जवागल श्रीनाथ (Javagal Srinath)

या अनुभवी माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने प्रथम भारताकडून सर्वात वेगवान चेंडू टाकल्याचे सांगितले जाते. श्रीनाथने 154.5 च्या वेगाने चेंडू टाकला. कर्नाटकच्या क्रिकेटपटूने 1999 विश्वचषकात शोएब अख्तरनंतर 149.6kph वेगाने चेंडू टाकला होता आणि दुसरा वेगवान गोलंदाज बनला होता. त्याचवेळी, एका अनधिकृत अहवालात असेही सूचित केले आहे की 1996 मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर श्रीनाथने 157kph वेगाने गोलंदाजी केली, परंतु विश्वसनीय स्पीड गन नसल्यामुळे ही संख्या अधिकृत यादीत नोंदली गेली नाही.

2. इरफान पठाण (Irfan Pathan)

पठाण एक गोलंदाज म्हणून त्याच्या पूर्ण क्षमतेने खेळला नाही असे म्हटले जाते परंतु त्याने मर्यादित संधींमध्ये छाप नक्कीच पाडली आहे. डावखुऱ्या स्विंग गोलंदाजाने आपल्या अचूक गोलंदाजीने फलंदाजांना त्रास दिला आणि 153.7 किमी प्रतितास वेग मारा केला, जो 2007 टी-20 विश्वचषक दरम्यान अनधिकृतपणे दुसरा सर्वात वेगवान चेंडू होता.

3. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)

भारताचा आपला यॉर्कर किंग बुमराहने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान 153.26 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकुन या यादीत इरफान पठाणच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्याने 21 विकेट्ससह संयुक्त सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून मालिका संपुष्टात आणली.

4. मोहम्मद शमी (Mohammed Shami)

या क्षणी आपल्या गोलंदाजीत अचूकता आणण्यासाठी शमीने वेग कमी केला आहे. पण 2015 मध्ये मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान त्याने 153.3 किमी प्रतितासचा वेग नोंदवला होता. त्याने भारतासाठी सर्वात जलद 15 विकेट घेत मालिका पूर्ण केली.

5. नवदीप सैनी (Navdeep Saini)

उमरान मलिकसह हे चार भारतीय गोलंदाज या यादीत आघाडीवर आहेत, तर त्यांच्याशिवाय आणखी एक नाव आहे जे थोडे मागे असले तरी त्याने आपला ठसा उमटवला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 2019 आवृत्तीत नवदीप सैनीची 152.85kph वेगाची गोलंदाजी ही उमरानचा विक्रम मोडेपर्यंत भारतीयाने आयपीएलमध्ये टाकलेली सर्वात वेगवान डिलिव्हरी होती.