IPL 2022: ‘हार्दिक पांड्याने रोहित शर्माची आठवण करून दिली’, दिग्गज फलंदाजाने बांधले कौतुकाचे पूल!
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2022: भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) यंदाच्या आयपीएलच्या (IPL) 15 व्या पर्वात रोहित शर्माला (Rohit Sharma) जेव्हा पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार बनवले होते त्याची आठवण करून दिल्याचे मोठे विधान केले आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा गुजरात टायटन्स आयपीएलच्या सर्वात रोमांचक हंगामात एक घातक संघ म्हणून उदयास आला आहे आणि कर्णधार पांड्याने संघाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. हार्दिकच्या 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत तर फक्त एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. (IND Squad for SA T20I Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात होतील मोठे बदल; पाहा कोण करणार आराम, कोणाच्या हाती असेल संघाची कमान)

स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाइव्हवर बोलताना गावसकर म्हणाले की 2013 मध्ये जेव्हा रोहितची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा त्याने त्याच्या शॉट सिलेक्शनमध्ये सुधारणा केल्या आणि कर्णधार झाल्यानंतर हार्दिकने देखील असेच केले आहे. त्यांनी ठामपणे सांगितले, “मी हार्दिकबाबत जे पाहतोय तेच रोहित शर्माच्या बाबतीत घडले होते जेव्हा त्याला प्रथम हंगामाच्या मध्यभागी (आयपीएल 2013) मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाले होते. अचानक (आम्ही पाहिले) रोहित शर्मा 40, 50 आणि 60 धावांचे सुंदर कॅमिओ खेळताना आता शेवटपर्यंत राहतो आणि जबाबदारी घेतो. त्याचे शॉट सिलेक्शन अधिक चांगले झाले (त्याच्या कर्णधारपदामुळे). त्याचप्रमाणे, आपण पाहू शकता की हार्दिकसोबत घडत आहे, त्याची शॉट निवड खूपच छान आहे. अर्थात तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि रोहित शर्माच्या बाबतीत तसेच होते, तो कव्हर्स आणि क्लोज-इनमध्ये (त्या काळात) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. त्यामुळे पांड्या हे गुणही दाखवत आहे आणि त्यामुळेच गुजरात टायटन्स चांगली कामगिरी करत आहेत.”

दरम्यान आयपीएल 2022 च्या 43 व्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी बेबर्न स्टेडियमवर सुरु आहे. फाफ डु प्लेसिसच्या बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघात बदल करण्यात आले असून गुजरातने संघात दोन बदल केले आहेत. अभिनव मनोहर आणि यश दयाल यांच्या जागी प्रदीप सांगवान व साई सुदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे.