IPL 2022 Captain Salary: आयपीएल 15 मध्ये 10 कर्णधार दाखवणार दम; Faf du Plessis सर्वात ‘स्वस्त’, तर ‘हा’ भारतीय सर्वात महागडा कर्णधार, जाणून घ्या
आयपीएल 2022 (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022 Captain Salary: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी सर्व 10 संघांनी तयारी सुरु केली आहे. आयपीएल (IPL) 2022 चा पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. या वर्षी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांनी आयपीएल 2022 मध्ये त्यांचे कर्णधार बदलले आहेत. KKR ने श्रेयस अय्यरकडे कमान सोपवली आहे. तर आरसीबीने फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis) आणि पंजाब किंग्जने मयंक अग्रवाल यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. याशिवाय लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात लायन्स या दोन नव्या संघांनी केएल राहुल (KL Rahul) आणि हार्दिक पांड्या यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामापूर्वी सर्व 10 कर्णधारांच्या वेतनावर जाणून घ्या. (IPL 2022: ‘या’ खेळाडूचं नशीब फिरले; भारतासाठी दोन विश्वचषक खेळला, 2014 मध्ये IPL ची पर्पल कॅप जिंकणारा खेळाडू बनला नेट बॉलर)

यावर्षी आयपीएलचा सर्वात महागडा कर्णधार म्हणजे केएल राहुल आहे. राहुलला लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल लिलावापूर्वी 17 कोटींची मोठी रक्कम देऊन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. तर हार्दिक पांड्या यची गुजरात संघाने 15 कोटींच्या रकमेसह कर्णधार म्हणून निवड केली आहे. मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा आणि दिल्ली कॅपिटल्स रिटेन केलेला ऋषभ पंत यांना 16 कोटी देऊन फ्रँचायझीने संघाचा नंबर 1 खेळाडू बनवले आहे. आयपीएल 2022 मध्ये सर्व कर्णधारांची वेतन यादी खालीलप्रमाणे आहे.

सर्व 10 संघांचे कर्णधार आणि त्यांचे वेतन

1. केएल राहुल - लखनऊ सुपर जायंट्स, 17 कोटी

2. ऋषभ पंत - दिल्ली कॅपिटल्स, 16 कोटी

3. रोहित शर्मा - मुंबई इंडियन्स, 16 कोटी

4. हार्दिक पंड्या - गुजरात टायटन्स, 15 कोटी

5. केन विल्यम्सन - सनरायझर्स हैदराबाद, 14 कोटी

6. मयंक अग्रवाल - मयंक अग्रवाल, 14 कोटी

7. संजू सॅमसन - राजस्थान रॉयल्स, 14 कोटी

8. श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स, 12.25 कोटी

9. एमएस धोनी - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार, 12 कोटी

10. फाफ डु प्लेसिस - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, 7 कोटी