Jadeja hands over CSK Captaincy: आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premire League) 15 व्या हंगामाच्या मध्यातच चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार म्हणून पायउतार झाला आणि दिग्गज एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. अष्टपैलू खेळाडू प्रभावित करण्यात अपयशी ठरला आणि CSK 8 सामन्यांत फक्त 2 विजयांसह 9व्या स्थानावर विराजमान आहे. “रवींद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला CSK चे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे,” CSK ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे. “एमएस धोनीने मोठ्या हितासाठी सीएसकेचे (CSK) नेतृत्व करण्यास आणि जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगी दिली आहे,” निवेदनात पुढे म्हटले आहे. (Ravindra Jadeja Hands over CSK Captaincy: हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी रवींद्र जडेजाचा मोठा निर्णय, पहा कोणाच्या हाती आली CSK ची कमान)
अशा परिस्थितीत आता धोनी पुन्हा एकदा कर्णधार म्हणून कधी मैदानात उतरणार याची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून असेल. आयपीएलच्या प्लेऑफ शर्यतीतून जवळपास बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ 1 मे, रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपला पुढील सामना खेळणार आहे. त्यामुळे या सामन्यात धोनी पुन्हा एकदा नेतृत्वाची कमान हाती घेऊन मैदानात उतरेल. लक्षणीय आहे की दोन्ही संघ यावर्षी दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. यापूर्वी हैदराबादने चेन्नईला पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे या सामन्यातून CSK पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएल 2021 सह एकूण चार विजेतेपद काबीज केले आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनीने जडेजाकडे कर्णधारपद सोपवले. मात्र, संघाची सुरुवात खराब झाली आणि पहिल्या चार सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. कर्णधार पदाचा जडेजाच्या खेळावरही नकारात्मक परिणाम झाला. अष्टपैलू खेळाडू बॅट संघर्ष करावा लागला आणि सीएसकेसाठी आवश्यक असलेल्या विकेटही मिळवता आल्या नाहीत. तसेच अॅडम मिलने आणि दीपक चाहरच्या दुखापतींनी संघाच्या अडचणीत आणखी भर घातली. त्यामुळे आता फक्त 6 सामने शिल्लक असताना, सीएसकेसाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याची धूसर शक्यता आहे.