CSK IPL 2021 Jersey: ‘माझ्यासाठी लार्ज साइज प्लिज’! धोनीने नवीन जर्सी लाँच करताच अष्टपैलू रविंद्र जडेजाने दिला मजेशीर रिप्लाय!
एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा (Photo Credit: Instagram)

CSK IPL 2021 Jersey: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 2021 हंगामासाठी तीन वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. सीएसकेने (CSK) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) चाहत्यांना नवीन जर्सीची झलक शेअर केली. बुधवारी धोनीने फ्रँचायझीच्या नवीन जर्सीचे अनावरण केल्यावर अष्टपैलू रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर एक विनोदी टिप्पणी पोस्ट केली जेथे त्याने टीमला त्याच्यासाठी ‘एल साईझ’ जर्सी ठेवण्यास सांगितले. चेन्नई सुपर किंग्जने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नवीन जर्सीचे अधिकृतपणे अनावरण केले असून कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ठेवलेले पॅकेट उलगडताना दिसून येत आहे. चेन्नईच्या नवीन जर्सीमध्ये भारताच्या सशस्त्र दलाचा (Armed Force) सन्मान म्हणून ‘कॅमोफ्लॉज’ देखील आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत जे 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं दर्शवतात. (CSK Jersey for IPL 2021: एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या नवीन जर्सीचे केले अनावरण, सशस्त्र दलाला वाहिली श्रद्धांजली)

2008 मध्ये उद्‌घाटन आवृत्तीनंतर येलो आर्मीने आपली जर्सी बदलली आहे. जर्सीच्या अनावरण पोस्टच्या टिप्पण्या विभागात प्रतिक्रिया देताना सीएसके अष्टपैलू रवींद्र जडेजाने ‘एल साइज फॉर मी प्लीज’ लिहिले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी सामन्यात जडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याला इंग्लंडविरुद्ध मालिकेलाही मुकावे लागले आहे. जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी फलंदाजी करताना जडेजाला त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला होता ज्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले असून रिपोर्टमध्ये त्याच्या अंगठ्याची दुखापत गंभीर असल्याचे दिसून आले. पण या महिन्याच्या सुरुवातीला त्याने प्रशिक्षणाचा व्हिडिओ पोस्ट केले आणि आपल्या मैदानावर परतणार असल्याचं चाहत्यांना दाखवून दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

(Photo Credit: Instagram)

“सशस्त्र दलाच्या महत्त्वपूर्ण आणि निःस्वार्थ भूमिकेबद्दल जागरूकता वाढविण्याचा मार्ग आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शोधत होतो. हा कॅमोफ्लॉज त्यांच्यासाठीच आहे…तेच आपले खरे नायक आहेत,” सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून चेन्नई येथे सुरु असलेला सीएसकेचा ट्रेनिंग कॅम्प आता मुंबईत हलवण्यात आला आहे. 26 मार्चपासून सीएसकेचा मुंबईत ट्रेनिंग कॅम्प सुरू होईल. चेन्नई संघ मुंबई येथे त्यांचे अधिक सामने खेळणार आहेत. 10 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नई आपल्या आयपीएल मोहिमेची सुरुवात करतील.