IPL 2021: धोनीने उघडले CSK च्या विजयाचे रहस्य, जिंकण्याचा सोपा मार्ग शोधून खेळाडू करत आहे त्याचे अनुसरण
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) 2020 चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) साठी खराब गेले असले तरी 2021 मध्ये चेन्नई एक्सप्रेस पुन्हा विजयी मार्गावर परतली आहे. त्याच खेळाडूंसह, ज्यांना गेल्या हंगामात पराभूत व्हावे लागले होते, ते यंदा हंगामात गुणतालिकेत नंबर एक क्रमांकावर आहेत. चेन्नईचे प्लेऑफ स्थान जवळपास निश्चित आहे. आणि ‘येलो आर्मी’च्या खेळाची पातळी पाहून हे देखील स्पष्ट आहे की यंदा धोनीच्या सुपर किंग्जचे हेतू भिन्न आहेत. आता प्रश्न असा आहे की, शेवटी काय झाले, एमएस धोनीने (MS Dhoni) कोणती युक्ती काढली की संघात परिवर्तन झाला. त्यांना जिंकण्याची सवय लागली. शारजामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) पराभव केल्यानंतर स्वतः धोनीने या मोठ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सीएसके (CSK) कर्णधार धोनी म्हणाला की, त्याच्या संघाकडे साधा फंडा आहे. आणि, हाच त्याच्या यशाचा मंत्र आहे. आता सुपर किंग्सचा तो फंडा काय आहे ते देखील समजून घ्या. (IPL 2021: चेन्नई विरुद्धचा सामना हरल्यानंतर विराट कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूवर नाराजी केली व्यक्त, पाहा व्हिडिओ)

“आमच्या खेळाडूंनी कठोर परिश्रम केले आहेत, त्यांना त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या समजल्या आहेत. येथे, तीन मैदाने वेगळी आहेत. हे सर्वांपेक्षा हळू (आतापर्यंत) आहे. दुबई आणि अबू धाबी वेगळे आहेत. त्यामुळे खेळाडू जुळवून घेत आहेत,” धोनी आरसीबीवर सहा विकेट्सच्या सहज विजयानंतर म्हणाला.  धोनीने शुक्रवारी आयपीएलच्या या मोसमात आपल्या संघाच्या उल्लेखनीय बदलाचे श्रेय खेळाडूंच्या मेहनतीला आणि त्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या समजून घेण्याला दिले. CSK चे खेळाडू त्यांची भूमिका, त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. आरसीबी विरुद्ध नायक बनलेल्या डीजे ब्रावोने 3 विकेट घेतल्या. विराट आणि पडिक्क्लची जोडी फोडण्यासाठीही त्याने असेच केले होते. धोनी अनेकदा डेथ ओव्हर्समध्ये ब्रावोचा वापर करतो. पण, या सामन्यातील खेळपट्टीचा संथ मूड पाहून त्याने आपली भूमिका बदलली, ज्याचा उल्लेख धोनीने सामन्यानंतरही केला.

“मी मोईनला (अली) ड्रिंक्सच्या आधी सांगितले होते की तो लवकरच गोलंदाजी करेल, पण नंतर मी ब्रावोला गोलंदाजी द्यायचे ठरवले. ब्रावोला जितका उशीर कराल तितका तो कठीण आहे कारण तो या कठीण परिस्थितीत सरळ चार षटके गोलंदाजी करेल.” धोनीने त्याच्या दीर्घकालीन CSK सहकारी ब्रावोला ‘भाऊ’ म्हटले, ज्याने त्यांना कोहलीच्या विकेटसह खेळात परत आणले. “”ब्राव्हो तंदुरुस्त झाला आहे - ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तो उत्तम प्रकारे कार्य करत आहे. मी त्याला माझा भाऊ म्हणतो.”