IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या अडचणीत आणखी वाढ, अफगाणिस्तानचा ‘हा’ फिरकीपटू अद्याप व्हिसाचा प्रतीक्षेत
मुजीब उर रहमान (Photo Credit: BCCI/IPL)

IPL 2021 in UAE: अफगाणिस्तान (Afghanistan) क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) रविवारपासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग  (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळणे कठीण डस्ट आहे. मुजीबला अद्याप यूएईच्या (UAE) लेगसाठी व्हिसा मिळालेला नाही तर त्याच्या टीमला आपला पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) दुसऱ्या लेगमध्ये एका आठवड्यानंतर खेळायचा आहे. सनरायझर्स हैदराबादचा इंग्लिश सलामीवीर जॉनी बेअरस्टोने दुसऱ्या लेगमधून आधीच माघार घेतली आहे आणि जर मुजीब खेळला नाही तरी संघासाठी हा मोठा धक्का ठरेल. संघ आधीच 2021 गुणतालिकेत तळाशी बसलेला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्राने ANI वृत्तसंस्थेला सांगितले की, “यावर अद्याप काम सुरू आहे आणि मुजीब त्याच्या फ्रँचायझी संघात कधी सामील होईल याबद्दल कोणतीही पुष्टी नाही. त्याच्या व्हिसासंदर्भात अजूनही काम सुरु आहे आणि यासंदर्भातील कोणतीही माहिती लवकरच उघड होईल.” (IPL 2021 Points Table: आयपीएल 14 च्या युएई लेगची उत्सुकता, पाहा कोणता संघ प्ले-ऑफच्या वाटेवर)

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात आमनेसामने येतील. 8 पैकी 6 सामने जिंकून दिल्ली कॅपिटल्स सध्या आयपीएल पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादची पहिल्या लेगमध्ये खराब कामगिरी राहिली होती आणि संघ त्यांच्या सात सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकू शकला. या कारणास्तव संघ सध्या गुणतालिकेत तळाशी विराजमान आहे. दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेटचे दोन दिग्गज राशिद खान आणि मोहम्मद नबी सनरायझर्स हैदराबाद संघात सामील झाले आहेत. राशिद आणि नबी दोघेही संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) पोहोचले आहेत आणि सध्या त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहेत. सूत्रांनी सांगितले की SRH व्यवस्थापन दोन्ही खेळाडूंच्या कुटुंबीयांची प्रत्येक वेळी विशेष काळजी घेईल. सध्याच्या काळात अफगाणिस्तानातील राजकीय उलथापालथी दरम्यान दोन्ही खेळाडूंचे मन मोकळे राहणे फार महत्वाचे आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना समान वातावरण दिले जाईल. 22 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हंगामाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिला सामना खेळतील.

कॅरिबियन प्रीमियर लीग आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका मालिकेतून येणारे खेळाडू आपापल्या संघाच्या बबलमध्ये सामील होण्यापूर्वी दोन दिवस क्वारंटाईन राहतील. बबल ते बबल ट्रान्सफर म्हणजे त्यांना कोविड-19 वर नजर ठेवून सहा दिवस अलग ठेवण्याची गरज नाही. सूत्रांनी पुष्टी केली की खेळाडू बबलमध्ये सहकाऱ्यांसोबत सामील होण्याआधी खेळाडूंना क्वारंटाईन केले जाईल आणि त्यांची कोविड-19 चाचणी केली जाईल.