IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या उर्वरित सामन्यांमध्ये Kane Williamson ला मिळाली कर्णधारपदाची जबाबदारी, डेविड वॉर्नरकडून हिसकावली कॅप्टन्सी
शनिवारी सनरायझर्स हैदराबादने डेविड वॉर्नरची कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आणि केन विल्यमसन याला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी दिली असल्याची फ्रँचायझीने घोषणा केली. आयपीएल 14 च्या मागील 6 सामन्यातून एका विजयासह हैदराबाद संघ सध्या पॉईंट्स टेबलच्या तळाशी बसलेले आहेत.
IPL 2021: शनिवारी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) डेविड वॉर्नरची (David Warner) कर्णधारपदावरून हकालपट्टी केली आणि केन विल्यमसन (Kane Williamson) याला इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी कर्णधारपदाची जबाबदारी दिली असल्याची फ्रँचायझीने घोषणा केली. आयपीएल 14 च्या मागील 6 सामन्यातून एका विजयासह हैदराबाद संघ सध्या पॉईंट्स टेबलच्या तळाशी बसलेले आहेत. हैदराबाद संघाने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. वॉर्नरच्या अनुपस्थितीत विल्यमसनने यापूर्वी देखील हैदराबाद संघाचे नेतृत्व केलेले आहे. हैदराबादचा आगामी सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) 2 मे रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (फिरोज शाह कोटला मैदान) होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2019 च्या हंगामात जेव्हा वॉर्नरवर एक वर्षाची बॉल-टेंपरिंग प्रकरणात बंदी लागली होती तेव्हा विल्यमसनने संघाचे नेतृत्व केले होते. सनरायझर्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता आणि न्यूझीलंड कर्णधाराच्या नेतृत्वात स्पर्धेत चौथे स्थान मिळवले होते. (IPL 2021 खेळून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना घरी परतल्यावर भरावा लागू शकतो 50 लाखांचा भारी दंड, वाचा काय आहे नक्की प्रकरण)
“सनरायझर्स हैदराबाद हे जाहीर करू इच्छित आहे की उद्याच्या सामन्यासाठी आणि आयपीएल 2021 च्या उर्वरित संघासाठी केन विल्यमसन कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारेल. उद्या, राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यासाठी त्यांचे परदेशी संयोजन बदलण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. डेविड वॉर्नरने कित्येक वर्षांपासून या फ्रँचायझीवर जे परिणाम केले त्याबद्दल मॅनेजमेन्टने सन्मान केला म्हणून हा निर्णय हलका ठरला नाही. हंगामाच्या उर्वरित सामन्यांचा सामना करत असताना आम्हाला खात्री आहे की मैदानात आणि बाहेर दोन्ही बाजूंनी यशासाठी धडपडत डेविड आपल्याला मदत करत राहील,” एसआरएचने एका निवेदनात म्हटले आहे. सनरायझर्सने यापूर्वी 2016 मध्ये अखेर आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
वॉर्नरला या मोसमात फलंदाजीने फारसा प्रभाव पडत आलेला नाही आहे. बऱ्याचदा तर हैदराबादचा कर्णधार विकेट गमावण्याच्या भीतीने बाद झाला आहे. दोन वेळा अर्धशतकी धावसंख्या करूनही वॉर्नर स्वत:ला फलंदाज म्हणून व्यक्त करण्यात अपयशी ठरला आणि एमएस धोनीच्या सीएसकेविरुद्ध अखेरच्या सामन्यात धावसंख्येचा गती देखील खाली आणली. दरम्यान, आता हैदराबादकडे वॉर्नरची जागा घेण्यासाठी इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय पर्याय म्हणून उपलब्ध आहे. दुसरीकडे, सनरायझर्सने आयपीएलच्या मध्यातून कर्णधार बदलण्याची घटना पहिल्यांदाच घाडली नाही आहे. 2014 आयपीएलमध्येही हे घडले होते. शिखर धवनच्या जागी सनरायझर्स हैदराबादने वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीला नेतृत्वाची जबाबरी सोपवली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)