IPL 2021 Auction: पुढील वर्षाचा आयपीएल लिलाव स्थगित, सध्याच्या खेळाडूंसह मैदानात उतरणार संघ
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

बीसीसीआय (BCCI) 2021 हंगामात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मेगा-लिलावाचे आयोजन स्थगित करण्याची शक्यता आहे. लिलावात प्रत्येक फ्रेंचायझी जवळपास सुरवातीपासूनच आपली पथके तयार करतात परंतु कोरोना व्हायरसने लिलाव अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यास भाग पाडेल असे दिसत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 13 व्या आवृत्तीत झालेल्या बदल्यांच्या व्यतिरिक्त, फ्रँचायझींनी त्याच खेळाडूंचा तोच सेट कायम ठेवणे अपेक्षित आहे. आयपीएल 13 संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होईल. आयपीएल 2020 अखेरीस आणि लीगच्या 2021 च्या हंगामाच्या सुरूवातीस दरम्यान, बीसीसीआयकडे साडेचार महिन्यांची विंडो असेल अशीही माहिती मिळाली आहे. पारंपारिकपणे आयपीएलची सुरुवात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होते. यंदा भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. मात्र, टी-20 वर्ल्ड कप स्थगीत झाल्याने बीसीसीआय आता 'त्या' विंडोत आयपीएल आयोजित करत आहे. (IPL 2020 in UAE: इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन यूएईमध्ये करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी)

फ्रॅन्चायझी देखील बीसीसीआयच्या मेगा लिलाव स्थगित करण्याच्या समर्थनात आहेत.  लिलावासाठी पर्सची पुनर्रचना, लिलावाची यादी तयार करणे, लिलाव धोरणे आणि ब्रँड अ‍ॅक्टिव्हिटीजवर मंथन करणे यासह अनेक महिने पुरेसे नियोजन आवश्यक आहेत. मेगा लिलावाबाबत तसेच भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट दिनदर्शिकेबाबत पुढील काही आठवड्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 2021 च्या आयपीएलनंतर श्रीलंकाविरुद्ध मालिका आणि आशिया चषक, ज्या दोन्ही टूर्नामेंट्स कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आल्या.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 2021 च्या आवृत्ती आधी भारतात इंग्लंडविरुद्ध मालिकेचे आयोजन केले जाईल. इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर दोन्ही टीममध्ये टी-20, कसोटी आणि वनडे मालिका खेळणे अपेक्षित आहे. दोन्ही बोर्डात याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.