IPL 2021: चेन्नईप्रमाणे ‘हा’ संघ देखील शुक्रवारी दुबईला पोहोचण्याच्या तयारीत, पण आहे ही मोठी अडचण
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) प्रमाणे, गतविजेता मुंबई इंडियन्स (MI) देखील शुक्रवारी दुबईला पोहचण्याचा तयारीत आहे. 19 सप्टेंबर रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या आवृत्तीच्या यूएई लेगच्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येतील. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना, घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पुष्टी केली की मुंबई इंडियन्स शुक्रवारी दुबईला (Dubai) पोहचण्यास उत्सुक आहेत आणि लँडिंगच्या परवानगीची वाट पाहत आहेत. आयपीएल (IPL) 2021 च्या उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून होणार आहे. मे महिन्यात, बायो-बबलमध्ये वातावरणात कोरोना व्हायरस संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर स्पर्धा मध्यंतरी पुढे ढकलण्यात आली होती. (IPL 2021: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ब्रिटिश खेळाडूंना मिळाला ग्रीन सिग्नल, टीम इंडियासोबत UAE साठी भरणार उड्डाण)

गेल्या महिन्यात बीसीसीआयने आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार चेन्नई आणि मुंबई पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, “संघ सीएसके प्रमाणेच यूएई सरकारच्या लँडिंग परवानगीची वाट पाहत आहे आणि एकदा त्यांना ते मिळाले की, ते शुक्रवारी दुबईतही उतरण्याच्या निर्धारित आहेत. हे मुंबई इंडियन्ससाठी बबल-टू-बबल ट्रान्सफर असेल, परंतु यूएईमध्ये एकदाही प्रोटोकॉलनुसार त्यांना क्वारंटाईन ठेवले जाईल. हे बबल-टू-बबल आहे कारण खेळाडू आधीच मुंबईत बबल आणि ट्रेनिंगमध्ये आहेत.” मुंबई इंडियन्स युनिट घणसोली येथील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे त्यांच्या मैदानावर प्रशिक्षण घेत आहे. सूत्रांनुसार, मुंबई इंडियन्सचे घरगुती खेळाडू क्वारंटाईननंतर गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत. सध्या सेट-अपचा भाग असलेले सदस्य नियमितपणे कोविड-19 टेस्ट करत आहेत जेणेकरून प्रत्येकजण जोखीम मुक्त असेल.

दरम्यान, केवळ मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 2020 च्या आवृत्तीदरम्यान वापरलेली हॉटेल पुन्हा बुक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. तसेच इतर सर्व सहा फ्रँचायझी नवीन हॉटेल्समध्ये राहतील. बीसीसीआय एसओपीने संघांना प्राधान्याने लहान हॉटेल बुक करण्याचे आवाहन केले होते जेणेकरून बायो-सिक्युरिटीव्ह एन्व्हायरमेंटमध्ये सहभागी यूजर्ससाठी ते पूर्णपणे वापरता येतील. SOP त पुढे म्हटले आहे की जर मोठे हॉटेल निवडले गेले तर खेळाडू व कर्मचाऱ्यांना हॉटेलच्या स्वतंत्र विंगमध्ये ठेवले जाईल. टीमच्या झोन/मजल्यांमध्ये इतर कोणत्याही हॉटेल अतिथींना परवानगी दिली जाणार नाही. हॉटेल परिसरात विविध गटांचे मिश्रण होऊ नये म्हणून प्रत्येक फ्रँचायझी टीम, मॅच अधिकारी आणि मॅच मॅनेजमेंट टीमला समर्पित मजले/झोन दिले जातील.