IPL 2020 Update: 'टी-20 वर्ल्ड कपऐवजी आयपीएल आयोजित केल्यास प्रश्न उपस्थित केले जातील'; आयपीएल, टी-20 विश्वचषकाबाबत इंझमाम उल हकने केलं मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द झाल्यास आणि त्याच्या जागी दिलेल्या विंडोमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित झाल्यास प्रश्न उद्भवू शकतात असे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल हक यांनी म्हटले.

आयपीएल ट्रॉफी, टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी (Photo Credit: Getty/IANS)

ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित होणारी आयसीसी टी-20 विश्वचषक ( ICC T20 World Cup) स्पर्धा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द झाल्यास आणि त्याच्या जागी दिलेल्या विंडोमध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) आयोजित झाल्यास प्रश्न उद्भवू शकतात असे पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम-उल हक (Inzamam-ul Haq) यांनी म्हटले. यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत आयसीसीकडून (ICC) अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आयसीसीने यासंदर्भात सदस्यांची दोन वेळा बैठक बोलावली, पण त्या बैठकीत निर्णय मात्र घेण्यात आला नाही. टी-20 विश्वचषकच्या आयोजनाच्या निर्णयावर यंदाच्या आयपीएलचे आयोजन अवलंबून आहे. मात्र, आयसीसीकडून या स्पर्धेबाबतच्या निर्णयाला उशीर होत आहे, त्यामुळे बीसीसीआयने आपली नाराजी बोलून दाखवली आहे. टी-20 विश्वचषकचे आयोजन यंदा ऑक्टोबर 18 ते नोव्हेंबर 15 दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. (IPL 2020 Update: टी-20 वर्ल्ड कप निर्णयाबाबत सतत उशीर झाल्याने BCCI चा ICC ला इशारा, आयपीएलच्या नियोजनाच्या तयारीला करणार सुरुवात)

“अफवा आहे की वर्ल्ड कप आयपीएल आणि ऑस्ट्रेलिया-भारत मालिका यांच्यात भिडला आहे, म्हणूनच (टी -20 वर्ल्ड कप) होणार नाही,”इंजमाम यांनी रविवारी आपल्या YouTube वाहिनीवर सांगितले. "भारतीय क्रिकेट बळकट असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) त्याचे नियंत्रण आहे. कोविड-19 मुळे आम्ही विश्वचषक जिंकू शकत नाही असे ऑस्ट्रेलियाने म्हटले तर त्यांचे हे धोरण सहजतेने स्वीकारले जाईल, परंतु त्याच वेळी अशा प्रकारची घटना घडल्यास प्रश्न उपस्थित केले जातील," असे ते म्हणाले.

इंझमाम म्हणाले, "लोक विचार करतील की जर एखादा देश 12 ते 14 (16 संघ) चे आयोजन करू शकत असेल तर आयसीसी संघांची देखभाल का करू शकत नाही, अखेर ऑस्ट्रेलिया इतका प्रगत देश आहे. दुसरी बाब म्हणजे, आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर खासगी लीगला (आयपीएल) प्राधान्य देऊ नये. यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडूंव्यतिरिक्त इतर खासगी लीगमध्ये युवा खेळाडू भाग घेतील." दुसरीकडे, आशिया चषकच्या आयोजनाबाबतही अद्याप संभ्रम कायम आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यंदा तटस्थ देशात आशिया चषक स्पर्धेचे सप्टेंबर महिन्यात आयोजन करणे अपेक्षित आहे. इंझमाम म्हणाला, “मी असेही ऐकले आहे की आशिया चषकांच्या तारखांवरही आक्षेप नोंदविला जात आहे कारण ही स्पर्धा दुसऱ्या स्पर्धांसोबत तारखा जुळत आहेत. आयसीसी, आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आणि सर्व क्रिकेट मंडळांनी एकत्र बसून आंतरराष्ट्रीय क्रिकेटऐवजी अशा प्रकारची छाप (खासगी लीगला प्राधान्य देणे) होणार नाहीकोणताही संदेश द्यावा.”