IPL 2020 Update: किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्सने सुरु केली नेट प्रॅक्टिस; मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणखी 7 दिवस होणार क्वारंटाइन
किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्सने सुरु केली नेट प्रॅक्टिस (Photo Credit: Twitter/Instagram)

इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आयपीएल (IPL) 2020 सुरू होण्यापूर्वी 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून सराव सुरू केला आहे. राजस्थानचा संघ 20 ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचला आणि त्याच दिवसापासून सर्व खेळाडू क्वारंटाईन झाले होते. अशा परिस्थितीत, गुरुवारी संध्याकाळी क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर त्यांचे पहिले प्रशिक्षण सत्र आयोजित केले गेले. शिवाय, किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) टीमने देखील क्वारंटाइन कालावधी पूर्ण करून नेट प्रॅक्टिसला सुरुवात केली आहे. किंग्स इलेव्हनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) प्रशिक्षण सत्र सुरु केले ज्यामध्ये त्याने सांगितले की देशात हवामान गरम आहे (हॉट) आहे आणि ते थोडे बरे असते अशी आशा व्यक्त केली. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळले जाईल. आयपीएल 2020 चे अधिकृत मात्र वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाहीत. (IPL 2020 Schedule Update: कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ, अबू धाबीतील निर्बंधामुळे आयपीएल 13 चे वेळापत्रक जाहीर करण्यात विलंब- रिपोर्ट)

दुसरीकडे, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी मात्र वाईट बातमी आहे. दोन्ही माजी विजेत्या टीमला आणखी 7 दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. यामागील कारण म्हणजे मुंबई इंडियन्स आणि केकेआर या दोघांचा मुक्काम अबू धाबी येथे आहे आणि येथील अबू धाबीच्या कोविड-19 प्रोटोकॉलनुसार कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी देण्यापूर्वी 14 दिवसांची क्वारंटाइन पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणूनच, दुबईमध्ये राहून 6 संघ सराव करण्यास सज्ज आहेत. दुबईमध्ये केवळ सात दिवस क्वारंटाइन कालावधी आहे. 20 ऑगस्ट रोजी केकेआर युएईला पोहोचणारा पहिला संघ होता, तर 21 ऑगस्टला मुंबई इंडियन्स अबू धाबीला पोहोचले.

किंग्स इलेव्हनचे ट्विट

राजस्थान रॉयल्सचा सराव

 

View this post on Instagram

 

Back. At. It. 💥 The Royals batsmen sweated it out in UAE last night. 📸 #HallaBol #RoyalsFamily #IPL2020

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals) on

आयपीएलच्या 13 व्या सत्रातील सामने तीन स्टेडियम-अबू धाबी, शारजाह आणि दुबई येथे खेळले जातील. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा अंतिम फेरी रविवार ऐवजी इतर दिवशी खेळला जाईल. यंदा स्पर्धेत 10 डबल-हेडर खेळवले जातील. दुपारचे सामने 3:30 वाजता तर संध्याकाळचे सामने 7:30 वाजता सुरु होतील. बीसीसीआयने अद्याप आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर केले नाही. सर्व संघ दुबईला पोहोचले असून क्वारंटाइन कालावधी संपताच ते सरावाला सुरुवात करतील.